राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या उपस्थितीत अंभोरे येथे काल्याचे हरिकीर्तन भक्तिभावात संपन्

संगमनेर (प्रतिनिधी)

पुरुषोत्तम मासानिमित्त अंभोरे येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात सरला बेटाचे महंत ह.भ.प. रामगिरीजी महाराज यांच्या पवित्र वाणीतून काल्याचे हरिकीर्तन मोठ्या भक्तिभावात संपन्न झाले. या कार्यक्रमाला राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभल्याने सप्ताहाच्या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

सद्गुरु जोग महाराज यांचे कृपापात्र शिष्य तथा अंभोरे येथील ब्रह्मलीन ह.भ.प. लक्ष्मण महाराज खेमनर (इगतपुरीकर) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित या अखंड हरिनाम सप्ताहात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते . काल्याच्या हरिकीर्तनात ह.भ.प. रामगिरीजी महाराज यांनी नामस्मरण, भक्ती, संत विचार आणि श्रीकृष्ण चरित्राचे महत्त्व विशद करत उपस्थित भाविकांना अध्यात्मिक मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी ग्रामीण भागातील धार्मिक परंपरा, संस्कार आणि वारकरी संप्रदायाची परंपरा जपण्यासाठी अशा सप्ताहांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. समाजात एकोपा, सद्भावना आणि अध्यात्मिक मूल्ये रुजविण्यासाठी धार्मिक कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी सप्ताह स्थळी उपस्थित राहून कार्यक्रमाची माहिती घेतली तसेच आयोजकांच्या कार्याचे कौतुक केले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्ते व ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

याप्रसंगी अंभोरे सप्ताह कमिटीचे पदाधिकारी, विविध संस्थानांचे प्रतिनिधी, वारकरी संप्रदायातील मान्यवर तसेच पंचक्रोशीतील हजारो भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हरिनामाच्या अखंड गजराने आणि भक्तिमय वातावरणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!