अश्वारूढ पुतळा वाढीव जागासह इतर प्रश्न सोडविण्यास परिवहन मंत्र्यांची सकारात्मकता-आ खताळ
मुंबई विधान भवनात परिवहन मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर बसस्थानकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्या वाढीव जागेसह बसस्थानकातील विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी राज्याचे परिवहनमंत्री ना प्रताप सरनाईक यांनी मुंबई येथील विधान भवनात झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मकता दर्शविली असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले
संगमनेर बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी २२०० स्क्वेअर फुट जागा उपलब्ध करून द्यावी संगमनेर आणि अकोले तालुक्यातील सर्व नागरिकांच्या सोयीसाठी संगमनेर येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात यावे,संगमनेर आगारासाठी २० नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात तसेच ग्रामीण भागासाठी मुक्कामी बस सेवा सुरू करावी. व्यापारी संकुलात दिव्यांग बांधवांसाठी ३% गाळे वाटप करण्याच्या उच्च न्यायालयाच्यानिर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी, तसेच बी ओ टी तत्त्वावर बांधलेल्या व्यापारी संकुलाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे अशा अनेक मागण्यांचे निवेदन आ. अमोल खताळ यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिले आहे
या सर्व मागण्यांवर चर्चा करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवनात परिवहन अधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत
संगमनेर बस स्थानकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्या च्या वाढीव जागे संदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी सकारात्मक निर्णय घेतला संगमनेर बसस्थानकासाठी लवकरच १० नवीन एसटी बसेस दिल्या जातील तसेच परिवहन कार्यालयाबाबतचा लवकरच धोरणात्मक निर्णय घेऊ तसेच संगमनेर बसस्थानकातील बी.ओ.टी तत्त्वावरील . व्यापारी संकुलनास हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्तावही बैठकीमध्ये ठेवण्यात येणार
असल्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आ अमोल खताळ यांना अश्वसित केले.
