स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीची मागणी; मुख्यमंत्र्यांना निवेदन

संगमनेर | प्रतिनिधी

स्वतंत्र विदर्भ राज्याची तातडीने निर्मिती करावी, अशी मागणी करणारे निवेदन संगमनेर येथील आत्माराम गजानन देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.

निवेदनात देशमुख यांनी नमूद केले आहे की, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी ती पूर्ण झाली नाही. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्यात अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचा निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तसेच, “इस जिंदगी का क्या भरोसा, आज है कल नहीं” या वाक्याचा उल्लेख करत, ही ऐतिहासिक संधी साधून स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करावी, अशी भावनिक सादही त्यांनी निवेदनातून घातली आहे.

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीमुळे पुन्हा एकदा विदर्भ राज्याच्या प्रश्नाची चर्चा सुरू झाली असून, या निवेदनाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!