शहीद जवान वामन पवार यांच्या कुटुंबांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मार्फत एक करोड रुपयाचा धनादेश.

 

परंडा तालुका / लोकवेध live न्यूज / हनुमंत मस्तुद

 

परंडा तालुक्यातील टाकळी गावचे शहीद जवान वामन मोहन पवार हे दिनांक 21.3 . 2013 रोजी इंडियन आर्मी मध्ये जॉईन झाले होते.
देश सेवा करत असताना ऑन ड्युटी दिनांक 29.9.2020 रोजी
शहीद झाले आहेत.
त्यांच्या कुटुंबीयांना परंडा तालुका त्रिदल सेवा सैनिक संघटने चे संस्थापक अध्यक्ष *संदीप लगड.* व धाराशिव जिल्हा जिल्हाध्यक्ष *समाधान लिमकर.* आणि सचिव *बबन पाटील.* यांच्या प्रयत्नातून शहीद जवान वामन मोहन पवार यांचे पिताश्री मोहन दिगंबर पवार आणि वीर पत्नी वैशाली वामन पवार यांना धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार आणि धाराशिव जिल्हा सैनिक कार्यालयाचे शरद प्रकाश पांढरे यांच्या उपस्थितीत Rs 1,00,00,000/- [ रुपये करोड ] चा धनादेश वितरित केला.
याप्रसंगी कर्नल शरद प्रकाश पांढरे साहेबांनी शहीद वामन पवार यांची शौर्यगाथा धाराशिव जिल्ह्या अधिकारी आदरणीय श्री कीर्ती किरण पुजार यांना व्यक्त केली.
धाराशिव जिल्ह्यातील शहिद सैनिक आणि माजी सैनिक यांच्या कल्याणासाठी माननीय कर्नल शरद पांढरे साहेबांनी जिल्हाधिकारी साहेबांना प्रशासनाकडून आवश्यक मदत मिळावी असे विनम्र आवाहन केले.
माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी या प्रसंगी सर्वांना आश्वासन केले की सैनिकांच्या कल्याणासाठी आवश्यक ते सर्व मदतीचे पर्याय त्यांच्या द्वारे पुरवले जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!