किशोर कालडा क्रीडामहर्षी पुरस्काराने सन्मानित
संगमनेर / लोकवेध live न्यूज / अण्णासाहेब काळे
कोल्हापूर येथील किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संस्था, महाराष्ट्र राज्य जिद्ध फाउंडेशन यांचा 2025 चा लक्षवेधी क्रीडा महर्षी पुरस्कार क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे संगमनेर येथील बहुआयामी व्यक्तिमत्व किशोर राधाकिसन कालडा यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
संगमनेर येथील किशोर कालडा हे सर्व परिचित असे आगळ वेगळं व्यक्तिमत्व अत्यंत प्रामाणिक कर्तबगार व आपल्या प्रेमळ हळव्या स्वभावाने कुणाला ही आपलंस करून घेणार व्यक्तिमत्व म्हणजे किशोर कालडा. आपल्या महाविद्यालयीन जीवनातूनच
महाविद्यालयचे सेक्रेटरी या पासून सुरु झालेला त्यांचा प्रवास हा पुढे पुढे सरकत असाच अविरत सुरुच आहे गेल्या 55 वर्षांपासून त्यांचा क्रीडा क्षेत्रात सहभाग आहे पुणे विद्यापीठात त्यांनी कुस्ती, बॉक्सिंग, वेट लिफ्टिंग, अथलेटिक्स आदी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली, मागे वळून कधी पाहिलेच नाही बॉडी बिल्डिंग स्पर्धेत त्यांची सदैव उपस्थिती राहिलेली आहे संगमनेर अहिल्यानगर जिल्हा तसेच उत्तर महाराष्ट्राचे बॉडी बिल्डिंग चे अध्यक्ष पद त्यांनी भूषवलेले आहे त्यानंतर युरोपला जागतिक स्पर्धा निरीक्षक, मालदीव येथे झालेल्या साऊथ एशियन स्पर्धेचा निरीक्षक, राष्ट्रकुल स्पर्धा कोलकत्ता येथे पथक प्रमुख पदाचा ही मान त्यांनी मिळवलेला आहे, अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निरीक्षक म्हणून त्यांनी काम केलेले आहे क्रीडा क्षेत्रात काम करत असताना त्यांचा विविध प्रसिद्ध व्यक्तींशीही संपर्क आला त्यात प्रामुख्याने ग्रेट खली, सतपाल पहलवान, करतार सिंग (पंजाबचे माजी आयजी), रंधवा आदी पहेलवान,धनराज पिल्ले, मेरी कॉम, पी टी उषा यांसारखे खेळाडू तसेच ब्राझील देशाचे जागतिक सुवर्ण पदक विजेत्या संघाचे पदाधिकारी, आशियाई ॲथलेटिक्स संघाचे अध्यक्ष दलाल अहमद, कुस्ती गिर दारासिंग, सुदेश कुमार, प्रेमनाथ, महासिंघराव पद्मश्री के गुरु हनुमान, सुशील कुमार, दादू चौगुले, गणपत आंधळकर मारुती माने चंदगीराम, रवींद्र कवडे, बाळासाहेब लांडगे यांसारखे प्रसिद्ध कुस्तीगीर ,जपानच्या जुनिअर जागतिक कुस्ती संघाबरोबर भेटही त्यांनी घेतली होती. आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर जज म्हणून काम करत असताना श्री कालडा यांचा प्रसिद्ध बॉडी बिल्डर मनोराईज प्रसाद, कुमार संग्राम, सुहास खामकर, किरण पाटील, जे कटलर अमेरिका, टेनिस कुक अमेरिका, राफेल संतोष या स्पेन जागतिक बॉडी बिल्डर अध्यक्ष वीरेंद्र गुमान पंजाबी अभिनेता व बॉडी बिल्डर प्रेमचंद्र डोंगरा यांसारखे मोठे मोठे बॉडी बिल्डर यांच्याशी त्यांचा जवळून संबंध आलेला आहे.अनेक पुरस्कार, अनेक संस्था अनेक क्षेत्रात त्यांनी नावलोकिक मिळवला आहे. कुस्ती बॉक्सिंग, वेटलीपटिंग ऐथेलेटिक्स अशा अनेक ठिकाणी आपल्या कार्याची, कर्तबगारीची छाप सोडली आहे. सामाजिक राजकीय व कला क्षेतात देखील त्यांची विशिष्ट ओळख आहे. अशा बहुआयामी व्यक्तिमत्वास यंदाचा लक्षावेधक्रीडा महर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचे संगमनेरसह संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
