महिलांचा सन्मान न करता सरपंचाने केले केवळ अहिल्यादेवींचे पूजन
गुंजाळवाडी महायुती कार्यकर्त्यांनी सरपंचावर कारवाई करण्याची केली मागणी
संगमनेर / लोकवेध live न्यूज / अण्णासाहेब काळे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त शासनाच्या निर्देशांमुसार गुंजाळ वाडी गावात उत्कृष्ट काम करणार्या दोन महिला कर्मचार्यांचा सन्मान न करता त्यांचा अवमान करत केवळ औपचारि कता म्हणूनच राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे प्रतिमा पूजन करून घेत कार्यक्रम उरकला, असल्याचा गंभीर आरोप गुंजाळवाडी येथील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सरपंचांवर करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी गटविकास अधिकार्याकडे केली .
संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी ग्रामपंचायत मध्ये सरपंच अमोल उर्फ नरेंद्र गुंजाळ यांनी ग्रामपंचायत उपसरपंच सदस्य आणि ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित नसताना गावातील काही ज्येष्ठ नागरिक यांचा उपस्थितीमध्ये राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे पूजन केले ही बाब महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आली त्यांनी त्यानंतर त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन सरपंच अमोल गुंजाळ यांना जाब विचारला. त्यावेळी महायुती कार्यकर्ते आणि सरपंचांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर संतप्त झालेल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन सरपंचांविरोधात तक्रार केली. सरपंचांनी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केलेअसून त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी संतप्त मागणी भाजपचे रोहिदास गुंजाळ,महेश जगताप, सुयोग गुंजाळ, अतुल गुंजाळ, गोकुळ गुंजाळ आदी कार्यकर्त्यांनी केली नेमकी याप्रकरणी पंचायत समिती प्रशासन गुंजाळवाडी ग्रामपंचायत सरपंचावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे
राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती च्या निमित्त उत्कृष्ट काम करणाऱ्या दोन महिलांचा सन्मान करण्यासाठी समिती तयार करून ग्रामपंचायतच्या वतीने दोन महिलांचा सन्मान करण्याचे परिपत्रक शासन स्तरावरून काढण्यात आले होते. मात्र गुंजाळवाडी ग्रामपंचातीचे सरपंचानी कुठली समिती स्थापन केली नाही तसेच त्या दोन महिलांचा सन्मान केला नाही ही अत्यंत संताप जनक बाब आहे
श्री रोहिदास गुंजाळ
माजी तंटामुक्ती अध्यक्ष गुंजाळवाडी
9850268594
