चांगल्या कामाची दखल घेतल्यास त्यातून प्रेरणा मिळते. सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींना समाजाने पाठबळ देणे गरजेचे आहे – अभिनेते मकरंद अनासपुरे
दे ना गोडगे प्रतिष्ठानच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेतील विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव
संगमनेर / लोकवेध live न्यूज / सुभाष भालेराव
यश मिळवण्यासाठी केवळ प्रयत्न करणे पुरेसे नाही, तर त्यात जिद्द आणि चिकाटी असणे आवश्यक आहे. जीवनात कठोर परिश्रम घेतल्यास निश्चित यश मिळतेच. त्यामुळे विद्यार्थ्यांनी यशासाठी कठोर परिश्रम घ्यावेत,डॉ. नंदकुमार गोडगे हे प्रतिष्ठानच्या माध्यमातून करीत असलेलेकार्य स्तुत्य आहे. चांगल्या कामाची दखल घेतल्यास त्यातून प्रेरणा मिळते. सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींना समाजाने पाठबळ देणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन प्रसिद्ध सिनेअभिनेते मकरंदअनासपुरे यांनी व्यक्त केले.दहावी व बारावी परीक्षेतील विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे देवराम नारायण गोडगे सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने डॉक्टर नंदकुमार गोडगे व ऍड.अविनाश गोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक 1 जून 2025 रोजी सकाळी नऊ वाजता संस्कृती मंगल कार्यालय या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे हे होते यावेळी अनासपुरे यांच्या हस्ते दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींचा गुणगौरव व सत्कार करण्यात आला
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचालक भारत मुंगसे, शिवाजी गोडगे, तात्यासाहेब दिघे, बाबासाहेब कांदळकर, राजेंद्र कहांडळ, नवनाथ जोंधळे, रामदास दिघे, सोपान जोंधळे, गणेश दिघे, संजय दिघे, शरद भागवत, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार गोडगे, अॅड. अविनाश गोडगे, उत्तम जोंधळे, राहुल जगताप, विक्रम खांडरे, मीना इल्हे, राजेंद्र गुंजाळ, अरुण महाराज दिघे, शरद महाराज ढवळे, विलास जोर्वेकर, नंदकुमार दिघे, राजेंद्र दिघे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नंदकुमार गोडगे यांनी केले. सूत्रसंचालन शरद महाराज ढवळे यांनी केले. अॅड. अविनाश गोडगे यांनी आभार मानले.
