कांताबाई सातारकर यांच्या नावाने राज्यस्तरीय लोक कलावंत पुरस्कार देणार

संगमनेरमधून आमदार अमोल खताळ यांनी केली घोषणा

संगमनेर : लोकवेध live न्यूज

विधायक उपक्रमातून तालुक्याच्या साहीत्यिक सांस्कृतिक आणि कला क्षेत्राला अधिक उंचीवर नेण्याचा प्रयत्न सर्वाच्या सहकार्याने आपण करणार असून,कलेच्या माध्यमातून संगमनेरचे नाव मोठे करण्यासाठी योगदान देणार्या तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांच्या स्मृती जतन करण्यासाठी त्यांच्या नावाने लोक कलावंताला राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार असल्याची घोषणा आ.अमोल खताळ यांनी केली.

आषाढी वारीच्या अध्यात्मिक सोहळ्या च्या पार्श्वभूमीवर आ.अमोल खताळ आणि महायुतीच्या पुढाकाराने “बोलावा विठ्ठल”या भक्तीगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.आषाढी एकादशीच्या दिवशी संगमनेरात प्रथमच संपन्न झालेल्या या सांस्कृतिक उपक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देवून स्वागत केले.केंद्र सरकारच्या नारदीय किर्तनाची शिष्यवृती मिळविणारे देशातील पहीले तरूण किर्तनकार गायक पराग पांडव आणि सुरभी कुलकर्णी यांच्या भक्तीगीतांनी सर्वाना मंत्रमुग्ध केले.संगीत संयोजक सत्यजीत सराफ,सिध्दार्थ थते,नरेंद्र साळवे,वैभव पवार,प्रथमेश बिडवे आदीच्या साथ संगतीने भक्तीगीतांची मैफल उपस्थितांची दाद मिळवणारी ठरली.माझे माहेर पंढरी,बोलावा विठ्ठल,कनाडा राजा पंढरीचा,आशा अनेक प्रचलित गाण्यांनी ही भक्तीगीतांची मैफल चांगलीच रंगतदार ठरली.
आ.अमोल खताळ म्हणाले की,संगमनेर च्या सांस्कृतिक वैभवाला नवा आयाम प्राप्त करून देण्यासाठी सांस्कृतिक क्षेत्रात काम सुरू केले असून,याचा पहीला प्रयत्न म्हणून दरवर्षी आषाढी एकादशीला भक्तीगीतांच्या कार्यक्रम करण्याची संकल्पना आहे.त्याची सुरूवात यावर्षी पासून केली असल्याचे त्यांनी सांगितले.

संगमनेरच्या भूमीला साहीत्य कला आणि सांस्कृतीचा मोठा वारसा आणि परंपरा आहे.अनेक कलाकारांनी या भूमीचे नाव मोठे केले आहे.कवी अनंत फंदी,शाहीर विठ्ठल उमप यांच्या पासून ते तमाशा कलावंत स्व.कांताबाई सातारकर पवळा भालेराव यांनी कला क्षेत्रात दिलेल्या योगदानाची जाणीव आपल्या सर्वाना आहे.यासर्व जेष्ठ आणि लोकमान्य कलावंताप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने या सर्व भूमीपुत्रांच्या नावाने दरवर्षी एक राज्यस्तरीय पुरस्कार देण्याची योजना तयार केली असून, यंदाच्या वर्षी पहीला पुरस्कार स्व.कांताबाई सातारकर यांच्या नावाने राज्यातील लोककलावंतास देण्यात येणार असून,यासाठी पुरस्कार निवड समिती गठीत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.सर्व गायक आणि वादक कलाकारांचा सत्कार त्यांच्या कुटुंबियां सह आ.खताळ यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ.स्मिता गुणे यांनी केले.कार्यक्रमास सांस्कृतिक अध्यात्मिक सामाजिक राजकीय व्यापारी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

माझ्या परीवारला वारकरी सांप्रदायाचा मोठा वारसा आहे.गेली सव्वीस वर्षमाझी आई न चुकता वारीला जाते.वारीच्या कारणाने माझ्या सारखपुड्याला सुध्दा ती आली नाही .,यंदाचे भाग्य मला खूप मोठे मिळाले आई समवेत चार कि मी अंतर चालत अनेक वर्षाच्या पांडूरंगाची आईने केलेल्या सेवेचे फळ म्हणून तालुक्यातील जनतेन त्यांची सेवा करण्याची संधी दिली आहे
आमदार अमोल खताळ
सदस्य संगमनेर विधानसभा

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!