माढा तालुक्यातील मोडनिब येथे भाजपा कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न..

 माढा तालुका / लोकवेध live न्यूज / हनुमंत मस्तुद 

हॉटेल कल्पतरु, मोडनिंब येथे माढा विधानसभा *(मंडल माढा पूर्व, माढा पश्चिम, करकंब, कुर्डुवाडी)* भारतीय जनता पार्टीच्या वतीने कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भारतीय जनता पार्टीतील *संघटनात्मक निवड प्रक्रिया* व कार्यकर्त्यांना आगामी *स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत* योग्य न्याय देवून, जुन्या-नव्यांना सोबत घेवून, एकजुटीने *भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवू*, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

या मेळाव्यात माढा लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय पाणीदार माजी खा. *मा. श्री. रणजितसिंह (दादा) नाईक-निंबाळकर साहेब* फलटण विधानसभा मतदार संघाचे आमदार *मा. श्री. सचिन पाटील साहेब* व माजी आ. *मा. श्री. रामभाऊ सातपुते साहेब,* भाजप जिल्हाध्यक्ष *मा. श्री चेतनसिंह केदार सावंत साहेब* यांच्या प्रमुख उपस्थिती हा मेळावा पार पडला.

यावेळी माढा पूर्व मंडल अध्यक्ष श्री. योगेश पाटील ,माढा पश्चिम मंडल अध्यक्ष श्री. योगेश बोबडे, कुर्डुवाडी मंडल अध्यक्ष श्री. अविनाश गोरे, करकंब मंडल अध्यक्ष श्री.हर्षल कदम माढा पूर्व सरचिटणीस श्री दत्तात्रय जाधव, सरचिटणीस श्री राहुल केदार, प्रकाश कुलकर्णी,जिल्हा कार्यकारिणी सदस्य धनाजी लादे, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष श्री नंदकुमार मोरे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री शहाजी यादव, महिला मोर्चा अध्यक्ष श्री माया माने, रविकांत जाधव, प्रताप व्यवहारे, गणेश सुर्वे, मदन मुंगळे ,यांच्यासह भारतीय जनता पार्टी प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, जिल्हा मोर्चा सेल आघाडी पदाधिकारी, मंडल पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख,बूथ प्रमुख, अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!