रणजितसिंह देशमुखांच्या हस्ते गंगाजल कावडीचे स्वागत; भक्ती आणि नेतृत्वाचा अनोखा संगम”

 

. संगमनेर / लोकवेध live न्यूज 

 

श्रावण महिन्याच्या पावन काळात जाखुरी येथील संकल्पनेश्वर महादेवाच्या अभिषेकासाठी त्र्यंबकेश्वर येथून पवित्र गंगाजल आणणाऱ्या कावड यात्रेचं गावात अत्यंत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं. या यात्रेला विशेष महत्त्व लाभलं ते राजहंस दूध संघाचे चेअरमन श्री. रणजितसिंह देशमुख यांच्या सन्माननीय उपस्थितीमुळे.

कावडधारी तरुणांनी तब्बल 100 किमी अंतर पायी पार करत गंगाजल गावात आणलं. या धार्मिक यात्रेने गावाला भक्तीमय वातावरणात रंगवले. “हर हर महादेव”, “बोल बम” च्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

यात्रेच्या स्वागतासाठी रणजितसिंह देशमुख, दूध संघाचे संचालक संतोष मांडेकर व रवींद्र रोहम आदी मान्यवर उपस्थित होते. देशमुख यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने जलाचे पूजन करण्यात आले.

स्वागतप्रसंगी बोलताना देशमुख म्हणाले,
“या पवित्र कावड यात्रेतून केवळ भक्ती नव्हे, तर समाजात शिस्त, एकता आणि सकारात्मक संस्कार रुजवले जातात. ही परंपरा टिकून राहणं हे आपल्या संस्कृतीचं बलस्थान आहे.”

गावकऱ्यांनी वाटपाट मार्गावर यात्रेकरूंना विश्रांती, अल्पोपहार व पाण्याची व्यवस्था केली. ही यात्रा एकसंधतेचा, श्रद्धेचा आणि शिस्तीचा उत्तम आदर्श ठरली आहे.

गावातील नागरिकांनीही देशमुख यांचे मन:पूर्वक आभार मानले आणि त्यांच्या उपस्थितीने या यात्रेला समाजभानाची जोड मिळाल्याचे मत व्यक्त केले. या कार्यक्रमातून जाखुरी गावान “श्रद्धा आणि नेतृत्वाच्या संगमातून घडलेली ही यात्रा, जाखुरीच्या इतिहासात कायम स्मरणात राहील”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!