भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ता शिबिर उत्साहात संपन्न : संघटनात्मक बळकटीकरणावर भर

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

भारतीय बौद्ध महासभा संगमनेर शहर आणि तालुका कार्यकारिणीतर्फे आयोजित कार्यकर्ता व चिंतन शिबिर दि. ३ ऑगस्ट २०२५ रोजी सिद्धार्थ विद्यालय, संगमनेर येथे मोठ्या उत्साहात पार पडले. शिबिराच्या आयोजनामागे उद्दिष्ट होते संघटनेच्या कार्यपद्धतीची सखोल माहिती, जबाबदाऱ्या आणि ध्येयधोरणांबाबत कार्यकर्त्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे.

कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. या शिबिराचे मार्गदर्शन विशेषत: अहिल्यानगर (उत्तर विभाग) जिल्हाध्यक्ष आदरणीय आयु. शांताराम रणशूर सर, केंद्रीय शिक्षक आदरणीय आयु. राजेंद्र साळवे सर, प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष आदरणीय आयु. गौतमजी पगारे सर, जिल्हा सरचिटणीस आदरणीय आयु. नरेंद्र पवार सर तसेच पर्यटन सचिव आदरणीय रावसाहेब पराड सर यांच्या उपस्थितीत झाले.

शिबिराचे सूत्रसंचालन संगमनेर तालुका सरचिटणीस बौद्धाचार्य आयु. राजू मुन्तोडे यांनी अत्यंत प्रभावी पद्धतीने केले. यावेळी संगमनेर शहर अध्यक्ष आयु. विनय घोसाळे, सरचिटणीस आयु. सचिन साळवे, कोषाध्यक्ष आयु. दिलीप भोरुडे तसेच तालुका अध्यक्ष व केंद्रीय शिक्षक आयु. अशोक गायकवाड, कोषाध्यक्ष आयु. प्रभाकर रोकडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

शिबिरात घेतलेले प्रमुख विषय पुढीलप्रमाणे:

  1. शिबिराचे उद्घाटन व शिबिरार्थींचा परिचय – आयु. शांताराम रणशूर सर
  2. भारतीय बौद्ध महासभेचे ध्येय आणि उद्दिष्ट – आयु. राजेंद्र साळवे सर
  3. शाखेचे कामकाज व हिशोबाचे स्वरूप – आयु. गौतम पगारे सर
  4. कार्यकर्ता आणि प्रबोधन यांची आचारसंहिता – आयु. राजेंद्र साळवे सर
  5. पदाधिकारी आणि त्यांची जबाबदारी – आयु. गौतम पगारे सर
  6. एकूण शिबिराचे मार्गदर्शन – आयु. नरेंद्र पवार सर

कार्यक्रमात आयु. दिलीप भोरुडे आणि आयु. प्रभाकर रोकडे यांनी मनोगत व्यक्त करत संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये एकसंघ भावना व बांधिलकी टिकवण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी संगमनेर तालुका अध्यक्ष आयु. अशोक गायकवाड सर यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.

या शिबिरामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून संघटनात्मक मजबुतीसाठी अशा प्रकारचे शिबिर नियमित आयोजित करण्याची गरज असल्याचे अनेकांनी व्यक्त केले. संगमनेर तालुका व शहर कार्यकारिणीतर्फे आयोजित हे शिबिर यशस्वी ठरले, असे स्पष्टपणे दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!