धांदफळक येथे मोठ्या उत्साहात बैल पोळा व ट्रॅक्टर पोळा साजरा

निमगाव पागा / लोकवेध live न्यूज / नामदेव बागडे

शेती माती आणि नाती टिकवणे अत्यंत महत्त्वाचे गरजेचे आहे आज ग्रामीण भागातील बळीराजा या संपूर्ण जगाचा पोशिंदा असून तो बैलपोळ्याच्या दिवशी वर्षभर केलेल्या कष्टाचं बक्षीस सर्जा राजाचा सन्मान करून त्याच्या मनातील मालक नव्हे तर एक मित्र म्हणून त्यासोबत राहण्याचा शब्द हाती घेऊन आपल्या काळ्या आईच्या सेवेसाठी दोघांचे ऋणबंध अत्यंत महत्त्वाचे असून यातूनच खऱ्या अर्थाने समाजाला सकस निरोगी धान्य नवीन बीज देऊन शेती सुधारित करण्यासाठी बळीराजा आपल्या नवीन युगातील बैल मित्र म्हणजे ट्रॅक्टर सोबत काम करत असतो या उपक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून धांदरफळ गावचे असलेले ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहतात हा खऱ्या अर्थाने ग्राम उत्सव धांदफळकरांचा आहे असे स्वदेश सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब देशमाने म्हणाले.

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे गेल्या आठ वर्षापासून आपण बैलपोळ्या सोबत ट्रॅक्टर पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. गेल्या आठ वर्षांपूर्वी धांदरफळ गावामध्ये बैल पोळ्याला आल्यानंतर चार ते पाच आलेल्या बैल जोड्या पाहून उद्योजक बाळासाहेब देशमाने यांच्या मनामधील पूर्वीचा बैलपोळा समोर आला. यापूर्वी बैल पोळ्यासाठी धांदरफळ बाजार तळावर १०० च्या आसपास असणाऱ्या बैल जोड्या असायच्या, परंतु आत्ता आता पाचच्या संख्येवर आल्या आहे आणि ह्या बैलची जागा आता ट्रॅक्टरने घेतली हे पाहून मनाला खेद वाटला आणि तेव्हापासून संकल्प केला की, पुढच्या वर्षीचा पोळा हा बैल पोळ्या सोबत ट्रॅक्टर पोळ्या साजरा करावा आणि ह्या धांदरफळ गावाच्या उत्सवाला उत्सव बळीराजा नामकरण करून आनंदाचे उत्सवाचे दिन यावे या निमित्ताने स्वदेश सामाजिक सेवाभावी संस्था आणि ग्रामपंचायत धांदरफळ बुद्रुक समस्त ग्रामस्थ यांच्या माध्यमातून आठ वर्षांपूर्वी बैलपोळा सोबत ट्रॅक्टर पोळा उत्सव धांदरफळकरांचा हा अभिनव उपक्रम हाती घेऊन ग्रामोत्सवाला चालना दिली. यावेळी स्वदेश सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने लकी ड्रॉ पद्धतीने बक्षीस वितरण करण्यात आले तर सहभागी झालेल्या सर्व ट्रॅक्टर चालक मालक यांना मानाचा फेटा सन्मानचिन्ह देऊन या ग्रामोत्सवाचा सहभाग रुपये १००० सन्मान बक्षीस घेऊन सन्मानित करण्यात आले तर या बैलपोळ्याच्या उत्सवाच्या निमित्ताने वर्षभर पशुधनाची आरोग्याची काळजी घेणाऱ्या पशुसेवक पशुसंवर्धन अधिकारी यांचा सन्मान करून तसेच ग्रामोत्सवाच्या आनंदाला साज चढवणाऱ्या धांदरफळ बुद्रुक येथील सुप्रसिद्ध कलासम्राट आयुब भाई मोमीन यांनी गणेश आरती, हनुमान चालीसा, सर्जा राजाची जोड, ढलता सुरज धीरे धीरे ढलते जायेगा, शेतकरी गीत , भाऊबीज सादर केले. शेतकरी बांधवांचा आनंद वाढवला हे धांदरफळ हे गाव दूध व्यवसायाचे मोठे गाव म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी होणाऱ्या विविध उत्सवांसाठी ताशा सम्राट सलीमभाई तांबोळी तर योगेश लहुंडे बंधू यांच्या जनता बँडने नव तरुणांना आकर्षित केले. यावेळी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक विकास काळे साहेब व पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित महाजन व सर्व पोलीस बांधवांनी चोख बंदोबस्त ठेवून धांदरफळकरांचा आनंदोत्सव शांततेत संपन्न होण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले. जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे यांच्या वतीने तसेच उद्योजक भाऊसाहेब कुशाबा डेरे स्वदेश युवा प्रतिष्ठान स्वदेश महिला मंच यांच्या वतीने तर स्वदेश उद्योग समूह संस्थापक बाळासाहेब देशमाने यांनी हा उत्सव साजरा होताना महत्वाचा सहभाग देऊन आपल्या गावाच्या सामाजिक व ग्रामोत्सवासाठी महत्त्वाचे योगदान दिले. धांदरफळ गावचा मानाचा बैल हा पोलीस बाळासाहेब खरात पाटील ग्रामपंचायत सरपंच उज्वला नवनाथ देशमाने सर्व सदस्य मंडळ मातीचा बैल धांदरफळच्या संत गोरोबा काका नगर येथील माती पासून बैल बनवणारे कलावंत सुनील वाकचौरे यांच्या मातीच्या बैलाचे पूजन करून सदरचा बैल हा गावचे ग्रामदैवत हनुमंत रायाचे दर्शन झाल्यानंतर या ग्रामोत्सवाची सुरुवात झाली. अशी आनंदाची परंपरा जपून सामाजिक भावना पुढे करून आजही आनंदाचा बैलपोळा धांदरफळ गावामध्ये साजरा होतो.

यावेळी स्वदेश सामाजिक सेवाभावी संस्था व ग्रामपंचायत धांदरफळ बुद्रुक समस्त ग्रामस्थ आयोजित उत्सव धांदफळकरांचा उत्सव बळीराजाचा ट्रॅक्टर पोळा लकी ड्रॉ महाविजेते बैलपोळा बैल जोडी प्रथम क्रमांक पुंजा कारभारी अभंग बाबा, द्वितीय क्रमांक उद्धव चंद्रभान गोरडे, तृतीय क्रमांक संजय लक्ष्‍मण जाधव, चतुर्थ क्रमांक सुयश लक्ष्मण क्षिरसागर, पाचवा क्रमांक लक्ष्मण भाऊराव क्षिरसागर, सहावा क्रमांक प्रथमेश रोहिदास घुले, सातवा क्रमांक आबाजी भाऊराव क्षिरसागर सहभागी झालेला सर्व बैलजोडी धारक यांना रुपये एक हजार एक सहभाग पारितोषिक व सन्मान चिन्ह देण्यात आले . ट्रॅक्टर स्पर्धा लकी ड्रॉ मानांकन प्रथम क्रमांक प्रथमेश अनिल कोल्हे, द्वितीय क्रमांक सुरज आहेर, तृतीय क्रमांक अनिल प्रभाकर वलवे, चतुर्थ क्रमांक, ज्ञानेश्वर बबन कोल्हे, पाचवा क्रमांक शंकर तोरकडी, सव्वा क्रमांक तेजस देशमुख, सातवा क्रमांक दीपक सीताराम कोल्हे सहभागी सर्व ट्रॅक्टर चालकांना रुपये १००० चा पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवनाथ देशमाने नवनाथ नाईकवाडी अविनाश देशमुख राजेश शिंदे सचिन देशमाने मोहन देशमाने शुभम डेरे सचिन देशमाने डॉक्टर संजय थोरात अतुल देशमुख भारत कोल्हे गोपीनाथ नाईकवाडी सुदेश युवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी सर्व संस्थांचे पदाधिकारी ट्रॅक्टर चालक-मालक यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता कासार यांनी तर आभार प्रदर्शन नवनाथ देशमाने यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!