संगमनेर जिल्हा घोषित करा; अन्यथा गांधीजींच्या मार्गाने करू या मरू आंदोलन – आत्माराम देशमुख
संगमनेर : लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्याचा स्वतंत्र जिल्हा म्हणून तात्काळ घोषणा करण्यात यावी, अन्यथा आम्हाला गांधीजींच्या मार्गाने “करू या, मरू या” आंदोलन करावे लागेल, असा इशारा चिखली (ता. संगमनेर) येथील रहिवासी आत्माराम गजानन देशमुख यांनी दिला आहे.
सरकारने जिल्हा निर्मितीच्या बाबतीत मनमानी, हुकूमशाही व पार्सिलिटी थांबवून जनतेच्या दीर्घकाळच्या मागणीकडे सकारात्मक दृष्टीकोनाने पाहावे, अशी मागणी त्यांनी केली. “संगमनेर जिल्हा झाल्यास प्रशासनिक सोय, शैक्षणिक व औद्योगिक विकास, रोजगार निर्मिती तसेच सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन कामकाजासाठी तो सर्वार्थाने सोईस्कर ठरेल,” असे देशमुख यांनी स्पष्ट केले.
“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नात वैयक्तिक लक्ष घालून संगमनेर जिल्हा जाहीर करावा. अन्यथा आपल्या दालनासमोर अहिंसक मार्गाने पण ठाम स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा देत त्यांनी सांगितले की, हा लढा हा संगमनेरवासीयांच्या अस्तित्वाचा व हक्काचा आहे.
👉 संगमनेर जिल्हा होणे ही आता काळाची गरज आहे.
👉 सरकारने आणखी वेळ न दवडता तातडीने निर्णय घ्यावा.
देशमुख यांच्या या प्रखर विधानामुळे जिल्हा निर्मितीच्या प्रश्नाला आता अधिक धार येण्याची चिन्हे आहेत.
