जाणीव फाऊंडेशनतर्फे शिक्षकांच्या कर्तृत्वाचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव!

संगमनेर / लोकवेध live न्यूज

शिक्षण हा समाज परिवर्तनाचा प्रमुख शिलेदार आहे. ग्रामीण ते शहरी भागातील शिक्षकांनी केवळ अध्यापनापुरते मर्यादित न राहता समाजप्रबोधन, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि शैक्षणिक चळवळींना चालना दिली आहे. अशा प्रेरणादायी शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी संगमनेर जनआरोग्य परिवार संचलित जाणीव फाऊंडेशनतर्फे लोकनेते बाळासाहेब थोरात गुणगौरव पुरस्कारांतर्गत शिक्षकांच्या कर्तृत्वाचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

पुरस्कार प्रदान सोहळा रविवार, दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी ठिक-११ वा. संगमनेर येथे होईल. या गौरव सोहळ्यास माजी शिक्षणमंत्री व लोकनेते बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीरजी तांबे, युवानेते सत्यजित तांबे, एकविरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, नगराध्यक्षा दूर्गाताई तांबे तसेच शिक्षणप्रेमी व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या पुरस्कारासाठी राज्यभरातून आलेल्या शेकडो अर्जांमधून निवड समितीने अत्यंत काटेकोरपणे शिक्षकांची निवड केली आहे. समितीचे अध्यक्ष अमित पाटणकर, बाळासाहेब हेंद्रे, सचिव संदीप काकड, भाऊसाहेब काकड, सतीश गोर्डे, विजय काकड आणि समन्वयक अंतोन मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शक व गुणवत्ताधिष्ठित निवड प्रक्रिया राबवण्यात आली.

पुरस्कारार्थी असे –
सोमनाथ कळसकर गुरूजी यांना समाजगौरव पुरस्कार, डॉ. पी. टी. बांबळे (अहिल्यानगर) यांना माजी आमदार डॉ. सुधीरजी तांबे धन्वंतरी पुरस्कार, श्रमदान परिवार (मिरजगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांना लोकनेते बाळासाहेब थोरात दंडकारण्य अभियान वृक्षमित्र पुरस्कार, बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश लक्ष्मण पाटील (जळगाव) यांना शिक्षणमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात राज्यस्तरीय टिचर आयकॉन अवॉर्ड तर 30 शिक्षकांना लोकनेते बाळासाहेब थोरात शिक्षकरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.संगमनेर जनआरोग्यम परिवार संचलित जाणीव फाउंडेशन लोकनेते बाळासाहेब थोरात गुणगौरव पुरस्काराने संगमनेर तालुक्यासह ठाणे, नाशिक, जळगाव जिल्ह्यात पवित्र ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या ३३ शिक्षकांसह समाजातील सेवाभावी व्यक्ती व संस्था यांचा गौरव शिक्षक दिनी करण्यात येणार आहे. हा गुणगौरव सोहळा येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालय येथे पार पडणार आहे.

या गौरव सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मा. शिक्षणमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात मा. आमदार डॉ. सुधीरजी तांबे साहेब, युवानेते आ. सत्यजितजी तांबे, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, आदिवासी सेवक बाबा खरात अपस्थित राहणार आहेत. श्री.मदने सोमनाथ भिमाजी, श्री.इनामदार आबु मस्तान, श्री.गंभिरे गणपत तुकाराम, श्री.क्षिरसागर संपत, श्री.गोरे संतोष एकनाथ, श्री.टपले अमोल उत्तम, श्री.खरे कृष्णराव सुंदरराव, श्री.संजय बाबुराव लहारे, श्री.उदमले राजेंद्र कारभारी, श्री.बॉतले सोमनाथ, श्रीम.मनिषा सुरेश मानकरी, श्री.बाळासाहेब विठ्ठल शिरोळे, श्री.विलास जालिंदर कडनोर, श्री.गोडे दारकू सोमनाथ, संगमनेर, श्री.शेलार केदार भिवंडी, श्रीम. रायकर रीना मन्साराम, श्रीम.सासवडे सुनंदा रामराव, श्री.आव्हाड अशोक मारुती, अहिल्यानगर, श्रीम.उघडे मंगल सोमनाथ, श्री.करवर महादू मंगा, श्री.बांबळे बाळासाहेब काशिनाथ, श्री.आरोटे बाळासाहेब श्रीरंग, श्री.महेश विष्णू पाडेकर, अकोले, श्री. देवके राजेंद्र माधव, संभाजीनगर, श्रीम.कांबळे संध्या शैलेंद्र, पुणे, श्री.बोरसे मनिष शांताराम, नाशिक, श्री.आरे अशोक नाना, ठाणे, श्री.मुंगसे प्रफुल्ल तुकाराम (देसकवठे), श्री.केदार भाऊसाहेब भागवत, श्री.साळवे रविकिरण, पारनेर, श्रीम.सहताडे जयश्री राहटडे, राहुरी,श्री. सूर्यवंशी अनंत,सोलापूर,श्रीम. सोनवणे सुनिता विक्रम, नाशिकरोड, श्री.सोनवणे राजेंद्र अरुण, नेवासा, श्री.साळुंके अविनाश, नांदगाव. या पुरस्काराचे अध्यक्ष श्री.अमित पाटणकर, श्री. बाळासाहेब हेंद्रे, सचिव संदीप काकड़, श्री.भाऊसाहेब काकड, श्री.सतीश गोर्डे, श्री.विजय काकड आणि समन्वयक श्री. अंतोन मिसाळ यांनी सदर पुरस्कार सोहळा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!