कर्मवीरांच्या विचाराचा वारसा अरुण कडू यांनी जपला….खा.शरदचंद्रजी पवार (अरुण कडू पाटील अभीष्टचिंतन सोहळा)

,निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी

 

नगर जिल्ह्याची अनेक वैशिष्ट्य आहेत. स्वातंत्र्याच्या आधीच्या काळात स्वातंत्र्याच्या चळवळीत नगर जिल्ह्याचे योगदान मोठे आहे. महात्मा गांधींनी चलेजावचा संदेश दिल्यानंतर काँग्रेस नेत्यांना अटक करून नगरच्या किल्ल्यात ठेवले होते.त्यात पंडित नेहरू यांचाही समावेश होता. नगर जिल्हा स्वातंत्र्याच्या आधीच्या काळात स्वातंत्र्याचा प्रेरक म्हणून राहिलाआहे.स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची समाज व्यवस्था भिन्न होती त्यानंतर समाजवाद व साम्यवाद पुढे आला साम्यवादी विचारसरणी नगर मध्ये वाढली स्वातंत्र्य चळवळीत दत्ता देशमुख कॉ.पी.बी.कडू पाटील,आबासाहेब निंबाळकर,भाऊसाहेब थोरात,अण्णासाहेब शिंदे, रावसाहेब शिंदे आदींचा सहभाग महत्त्वाचा होता त्यांनी स्वातंत्र्यानंतर सेवेचे भान ठेवत सर्व सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्र निर्मितीनंतर यशवंतराव चव्हाण यांची समतेची,विधायक व विकासाची भूमिका घेऊन पुढे जायचा निर्णय घेण्यात अहमदनगर जिल्हा पुढे होता.या नेतृत्वाने यशवंतरावांची समतेची भूमिका घेऊन पुढे जाण्याचा निर्णय घेतला. आज समाजात वेगळे चित्र आहे सबंध देशात एक वेगळी विचारधारा आलेली आहे.आज सामाजिक ऐक्य अडचणीत आले का असे चित्र दिसत आहे. समाजात कटुता न वाढवता राष्ट्रीय पातळीवर काही निर्णय घेण्याची भूमिका घेतली पाहिजे .रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा.अरुण कडू पाटील यांचा अभीष्टचिंतन सोहळा यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह,स्टेशन रोड, अहिल्यानगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस(श.प.) पार्टीचे अध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांचे शुभहस्ते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी खासदार शरद पवार यांची शुभ हस्ते अरुण कडू पाटील व शोभाताई कडू यांचा सपत्नीक सत्कार व संघर्षयात्री या गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पदावरून बोलताना बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की अरुण कडू डाव्या विचारसरणीचे लढवय्ये नेतृत्व असून शेतकरी कामगार शोषित यांच्यासाठी त्यांनी कार्य केले आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने त्यांनी संघर्ष केला मेहुणे या नात्याने त्यांनी सांगितले की आम्हाला त्यांची कधीही चेष्टा करता आली नाही ते देवाला मानत नसले तरी त्यांच्या भावी आयुष्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी यावेळी केली.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आ.शशिकांत शिंदे यांनी सांगितले की अरुण कडू हे सर्वसमावेशक असे नेतृत्व असून त्यांनी शिक्षण व सामाजिक क्षेत्रात नेतृत्व करून आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांनी विचार मांडताना सांगितले की अरुण कडू यांचा जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून सर्वसामान्य जनतेसाठी न्याय देण्याचा आदर्श आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न केला ते आमच्यासाठी आदर्श आहेत. सत्काराला उत्तर देताना अरुण कडू यांनी सांगितले की कॉ.पी.बी.कडू पाटील व सर्व वरिष्ठ नेत्यांच्या संस्काराचे बाळकडू मला मिळाल्याने हा प्रवास मी करू शकलो. या कार्यक्रमास,माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, पद्मश्री पोपटराव पवार, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी,अंकुशराव काकडे,खा.निलेशजी लंके,आमदार मोनिकाताई राजळे,आमदार हेमंत ओगले,आमदार सत्यजित तांबे,मा.आमदार दादाभाऊ कळमकर,आ.लहू कानडे, मा.आ.भानुदास मुरकुटे,मा. माजी मंत्री शंकरराव गडाख,राजेंद्र फाळके,नरेंद्र घुले,चंद्रशेखर घुले, माजी मंत्री बबनराव पाचपुते, दादाभाऊ कळमकर , डॉ.एस.एन.पठाण, प्राचार्य शिवाजीराव भोर, भाऊसाहेब कांबळे, डॉ.सुधीरजी तांबे, सुभाष डांगे कॉ.सुभाष लांडे सुरेश वाबळे,एकनाथ घोगरे,बाळासाहेब विखे,रावसाहेब म्हस्के, संभाजीराव चोरमुंगे,भास्कर फणसे ,किरण कडू,पंकज कडू हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार सत्यजित तांबे यांनी केले. तर आभार पंकज कडू यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!