स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने उभे करावे … राज्याचे माजी सचिव शिवाजीराव जोंधळे साहेब..
निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी
निमगाव जाळी ता. संगमनेर येथील के.आर.जोंधळे कृषी व सेवाभावी संस्थेच्या वतीने ज्ञानेश्वर रसाळ यांची मुख्याध्यापकपदी नियुक्ती झाल्याबद्दल व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासाठी संस्थेच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.महाराष्ट्र राज्याचे माजी सचिव शिवाजीराव जोंधळे यांचे शुभहस्ते व राज्याचे जलसंपदा विभागाचे सहसचिव सतीशराव जोंधळे यांचे उपस्थितीत भाऊ रसाळ यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. बी.सी.ए ची विद्यार्थिनी ईशा अशोक थेटे हीस यावेळी लॅपटॉपसाठी पंधरा हजार रुपयाची मदत संस्थेच्या वतीने करण्यात आली याप्रसंगी शिवाजीराव जोंधळे साहेब यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आज स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने उभे करण्याची गरज आहे ते काम रसाळ सरांनी पूर्ण केले दिलेले काम जिद्द व चिकाटीने करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राज्य पातळी पर्यंत चमकवण्याची कामगिरी रसाळ सरांनी केली. कार्यक्रमास सतिषराव जोंधळे साहेब,ठकाजी थेटे, प्रवरा बँकेचे व्हा. चेअरमन मच्छिंद्र थेटे,दिलीप डेंगळे, सुनिलशेठ डेंगळे, हेमंतशेठ तांदळे, प्राचार्य दिपक डेंगळे,मुख्या.बाबासाहेब गागरे , संजय थेटे,रावसाहेब डेंगळे,सुवर्णाताई डेंगळे, मायाताई बिडवे, आदी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इतिहासकार सुमित डेंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन दिलीप डेंगळे यांनी केले.
