श्रीरामपूर नाशिक बस आ खताळ यांच्या प्रयत्नातून सहा वर्षानंतर पुन्हा सुरू

आ अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांनी केले बसचे स्वागत

संगमनेर / लोकवेध live न्यूज /अण्णासाहेब काळे

संगमनेरचे प्रवासी मिळत नसल्याचे कारण देत गेली ६वर्षांपासून बंद असलेली श्रीरामपूर ते नाशिक तळेगाव मार्गे ही एसटी बस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ पाटील यांच्या विशेष प्रयत्नातुन श्रीरामपूर ते नाशिक ही एसटी बससेवा सुरु सुरू करण्यात आली आहे. या एसटी बसचे तळेगाव चौफुली वर आ .अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ आणि संगमनेर आगार व्यवस्थापक प्रशांत गुंड यांच्या हस्ते बसला हार घालून श्रीफळ वाढवत पूजा करून धुमधडाक्यामध्ये स्वागत करण्यात आले
तळेगाव आणि व निमोण परिसरातील सर्वसामान्य जनतेला नाशिक जवळ येते तसेच व्यवसायिकांना व्यवसायानिमित्त विदयार्थ्यांना शिक्षणासाठी तसेचआजारी रुग्णांना हॉस्पिटलसाठी नाशिकला जावे लागते. मात्र गेली सहा वर्षापासून ही बस बंद करण्यात आली होती. बसची सुविधा नसल्यामुळे नाशिकला कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. ही गैरसोय टाळण्यासाठी ही बस लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी तळेगाव व निमोण परिसरातील महायुतीच्या कार्य कर्त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा व आमदार अमोल खताळ पा यांच्याकडे केली होती .सर्व सामान्य जनतेची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आ अमोल खताळ यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडे १४ ऑगस्ट रोजी पत्र देत मागणी केली होती. या पत्राची जिल्हा वाहतूक नियंत्रक शाखेने दखल घेत श्रीरामपूर नाशिक तळेगाव मार्गे ही बस सेवा सुरु केली आहे. त्या बद्दल शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे व तालुका प्रमुख राजेंद्र सोनवणे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि आमदार अमोल खताळ यांचे आभार मानले आहे
या बसचे चालक कलीम सय्यद आणि वाहक बाबासाहेब लांडे यांचाही सत्कार करण्यात आला बाभळेश्वरचे वाहतूक नियंत्रक आरिफ शेख श्रीरामपूर नाशिक ही तळेगाव मार्गे बस सकाळी९ वाजता निघालीअन साडेदहा वाजता तळेगाव चौफुलीवर आली. त्यावेळी फटाक्याची आतिषबाजी करत या बसचे धुमधडाक्या मध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी अभियंता सेलचे प्रमुख हरिश्चंद्र चकोर शिवाजी आहेर प्रभारी सरपंच मयुर दिघे. पुंजाहारी दिघे बाळसाहेब दिघे अमोल दिघे डॉ आर पी दिघे सुनिल दिघे रामदास दिघे दत्तात्रय दिघे.,डॉ.भरत दिघे..अशोक दिघे श्रीराम महाराज शिंदे पंढरीनाथ ईल्हे,.संजय कवाडे दत्तात्रय दिघे ज्ञानेश्वर जानेकर…गुंजाळ मेजर
डॉ संतोष डांगे उत्तम दिघे अतुल कदम गोरक्ष ईल्हे रमेश दिघे निलेश दिघे राजेश दिघे,राहुल उकिर्डे गणेश बोडखे चांगदेव कांदळकर विनायक कांदळकर नितीन दिघे दीपक दिघे. दत्तात्रय दिघे यांच्यासह परिसरा तील नागरिक व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट
गेली सहा वर्षापासून श्रीरामपूर नाशिक एसटी बस सेवा बंद झालेली होती. या भागातील नागरिकांनी सातत्याने मागणी केली त्यानुसार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा आणि आमदार अमोल खताळ पा यांच्या विशेष प्रयत्नातून ही बससेवा सुरू झालेली आहे.याएसटी बसचा सिन्नर वनाशिक तसेच लोणी आणि श्रीरामपूर येथे हॉस्पिटलला जाण्यासाठीविद्यार्थ्यांना कॉलेज महाविद्यालया मध्ये जाण्यासाठी या एस टी बसेसचा उपयोग होणार आहे. तरी परिसरातील प्रवाशांनी ,विद्यार्थ्यांनी महिलांनी ज्येष्ठ नागरिकांनी या एसटी बसेसचा लाभ घ्यावा असे आवाहन आ अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांनी केले आहे

संगमनेर तालुक्यातील तळेगाव निमोण परिसरातील नागरिकांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ पाटील यांच्याकडे वेळो वेळी पाठपुरावा केला आणि गेली सहा वर्षापासून बंद असलेली श्रीरामपूर ते नाशिक व नेवासा श्रीरामपूर ते नाशिक अशा दोन बसेस तळेगाव मार्गे सुरू झालेल्या आहेत ही एसटी बस सेवा ना विखे आणि आ खताळ यांच्या विशेष प्रयत्नातून ही बस सेवा सुरू झालेली आहे अजूनही आपण या मार्गावर दोन-तीन फेऱ्या सुरू करण्याच्या विचारात आहे.तरी या या एसटी बस प्रवासाचा परिसरातील जेष्ठ नागरिकांनी महिलांनी विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा आणि पुन्हा ही एस टी बस सेवा बंद पडणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी आणि एसटी बसनेच प्रवास करावा
श्री प्रशांत गुंड
आगार व्यवस्थापक संगमनेर आगार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!