आयडीबीआय बॅंकेची समाजाभिमुख शैक्षणिक बांधिलकी – टाकळी शाळेला शालेय साहित्य भेट

टाकळी (अकोले) –

“आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो” या उदात्त विचारांची प्रचिती आयडीबीआय बॅंक शाखा अकोले यांनी दिली. सीएसआर निधीतून टाकळी जिल्हा परिषद शाळेला विविध शालेय साहित्य भेट देऊन शैक्षणिक कार्याला मोलाची मदत करण्यात आली.

या उपक्रमांतर्गत क्रॉम्टन कंपनीचे ४ हाय स्पीड सीलिंग फॅन, १ संगणक ऑफिस टेबल तसेच ४ एलईडी ट्युबलाईट्स शाळेला देण्यात आले. ही साहित्य भेट अकोले तालुक्याचे कार्यसम्राट, शिक्षणप्रेमी आमदार मा. डॉ. किरणजी लहामटे यांच्या सुविद्य पत्नी व सामाजिक कार्यकर्त्या सौ. पुष्पाताई लहामटे तसेच आयडीबीआय बॅंकेचे शाखाधिकारी श्री. मंडल यांच्या शुभहस्ते शाळेकडे सुपूर्द करण्यात आली.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे बाळासाहेब फोडसे, डॉ. जनार्दन मोरे, पोपटराव शेवाळे, दत्ताराम दातखिळे, संतोष नाईकवाडी आदी मान्यवर उपस्थित होते.

या शालेय साहित्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक सोयीस्कर आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण वातावरण उपलब्ध होणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. या उपक्रमाबद्दल टाकळी शाळेचे मुख्याध्यापक डॉ. श्रीनिवास पोतदार, सहशिक्षक संजय देशमुख, दत्तात्रय देवगिरे, सौ. संगीता धिंदळे व निता लेंभे यांनी आयडीबीआय बॅंकेचे आभार मानले.

शैक्षणिक बांधिलकीची सामाजिक जबाबदारी पार पाडताना बॅंकेने दाखविलेल्या या योगदानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!