*निमगाव जाळी येथे शहीद जवान दिन साजरा*…
निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी, ,
19 सप्टेंबर 1965 च्या भारत पाकिस्तान युद्धात वीरगती प्राप्त झालेले वीर शहीद जवान व निमगावजाळीचे सुपुत्र वीर शहीद अशोक ज्ञानदेव डेंगळे यांचा वीर शहीद जवान दिन आज पंडित नेहरू विद्यालय,निमगाव जाळी येथे साजरा करण्यात आला.याप्रसंगी वीर शहीद जवान यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी सचिव शिवाजीराव जोंधळे साहेब, प्रवरा बँकेचे व्हा.चेअरमन मच्छिंद्र थेटे, लोकनियुक्त सरपंच प्रतिभाताई जोंधळे, उपसरपंच सुरेशराव डेंगळे,समृद्धी उद्योग समूहाचे सोमनाथ जोंधळे, मा.उपसरपंच ज्ञानेश्वर डेंगळे, संस्थापक वीर शहीद जवान स्मारक समितीचे दिलीप शिवाजी डेंगळे, सदस्य वैभव वदक प्राचार्य बाबासाहेब गागरे, लंगोटे गुरु,ज्ञानेश्वर डेंगळे,शंकर डेंगळे, पर्यवेक्षक प्रताप जोंधळे व आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी वीर शहीद जवान अशोक ज्ञानदेव डेंगळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ बंधू शिवाजी ज्ञानदेव डेंगळे यांचे वतीने दिलीप शिवाजी डेंगळे यांनी यांनी विद्यालयास 51000/-रुपये देणगी विद्यालयास कायम ठेव पावती करण्याचे जाहीर केले.त्यातून येणारे व्याजाचे रकमेतून दरवर्षी विद्यालयातील इयत्ता 5 वी ते 12 वी मधील प्रथम तीन क्रमांक प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यास बक्षीस म्हणून देण्याचे जाहीर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र जोंधळे यांनी केले तर आभार खेमनर आर टी. यांनी केले.याप्रसंगी विद्यार्थी सर्व शिक्षक बंधू भगिनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
