इनरव्हिल क्लबच्या वतीने भाविकांना प्रसादरूपाने केळी वाटप
अंबाजोगाई / लोकवेध live न्यूज / सुरेश मंत्री
नवरात्र उत्सवाचे औचित्य साधत इनरव्हिल क्लब अंबाजोगाईच्या वतीने योगेश्वरी देवी मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना प्रसादरूपाने केळी वाटप करण्यात आले. दि. ३० सप्टेंबर रोजी आयोजित या उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या उपक्रमाचे आयोजन सामाजिक बांधिलकी जपत भाविकांमध्ये भक्तिभाव वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते. प्रसाद वाटपाच्या या उपक्रमात इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा संगीता नावंदर यांच्यासह रेखा तळणीकर, जयश्री लव्हारे, सुरेखा कचरे, जयश्री कराड, वर्षा देशमुख, सुलोचना मालवाड, मंदाकिनी साबणे या क्लबच्या सदस्या उत्साहाने सहभागी झाल्या.
या कार्यासाठी योगेश्वरी देवी मंदिर देवळ कमिटीचे सचिव गिरधारीलाल भराडिया, विश्वस्त सारंग पुजारी तसेच सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले. नवरात्र महोत्सवात भाविकांच्या सेवेसाठी केलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
