*दुधेश्वर पाझर तलावात अखेर निळवंडेचे पाणी* (*वंचित शेतकऱ्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश*..
निमगाव जाळी / लोकवेध लुवे न्यूज / अशोक गोसावी
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे दुधेश्वर पाझर तलाव परिसरातील निळवंडेच्या पाण्यापासून वंचित शेकऱ्यांची प्रलंबित मागणी होती की निळवंडेचे ओव्हरफ्लोचे पाणी निमगाव जाळी ता.संगमनेर येथील दुधेश्वर पाझर तलावात सोडण्यात यावे,ज्यामुळे वर्षानुवर्षी पाण्यापासून वंचित परिसरातील शेतीला लाभ होईल.. याचा विचार करून आज दिनांक 1 नोव्हेंबर 2025 रोजी दुधेश्वर पाझर तलावात पाणी सोडण्याच्या कामाची प्रत्यक्ष सुरवात मा.सचिव शिवाजीराव जोंधळे साहेब,प्रवरा बँकेचे व्हा. चेअरमन मच्छिंद्र पाटील थेटे व वंचित शेतकऱ्यांच्या शुभहस्ते करण्यात आली. या कामाचे पूर्ण श्रेय मा. नामदार राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री, जलसंपदा यांना जाते..जलसंपदा विभागाचे अमोल कवडे साहेब, महेश गायकवाड साहेब, वलवे साहेब, सोमवंशी साहेब यांच्या सकारात्मक सहकार्याने हा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कडे सातत्याने पाठपुरावा करणारे निमगाव जाळीचे भूषण,राज्याचे माजी सचिव शिवाजीराव जोंधळे साहेब, प्रवरा बँकेचे व्हा.चेअरमन मछिंद्र थेटे यांचे नेतृत्वाखाली सोपानराव तथा काका तळोले,रंगनाथ तळोले, बाळासाहेब वदक, ग्रा.पं. सदस्य ज्ञानेश्वर डेंगळे,वैभव वदक,नंदू तळोले,दादासाहेब जोंधळे, राजेंद्र सर्जेराव अरगडे, बापू तांबे,प्रकाश वदक आदी शेतकऱ्यांच्या पाठपुराव्यास अखेर यश आले.यावेळी परिसरातील शेतकऱ्यांबरोबर जनसेवा कार्यालयाचे दीपक सोनवणे, स्वप्नील म्हस्के, जोंगिंदर उपस्थित होते..
