हॉटेल चेअरमन गार्डन फॅमिली रेस्टॉरंट हॉटेलचा भव्य उद्घाटन समारंभ संपन्न

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

 

संगमनेर तालुक्यातील निंभाळे येथील मेहेत्रे उद्योग समूहाच्या वतीने सातमावलाई मंदिर पुणे शिर्डी बायपास समनापूर या ठिकाणी हॉटेल चेअरमन गार्डन फॅमिली रेस्टॉरंट हे नवीन हॉटेल सुरू झाले असून या हॉटेलचा उद्घाटन समारंभ बुधवार दिनांक 28 मे 2025 रोजी सायंकाळी सात वाजता मोठ्या थाटामाटात फटाक्यांची अतिशबजी करत संपन्न झाला आपण कुठलाही व्यवसाय सुरू केल्यास त्यामागे आपल्या आजोबाआजी आई-वडिलांचे आशीर्वाद असतात आणि त्यांच्याच हस्ते त्या व्यवसायाचे उद्घाटन झाल्यास त्यांचे आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्याबरोबर असतील या भावनेने युवा उद्योजक संकेत नितीन मेहत्रे यांनी सुरू केलेले हॉटेल चेअरमनचे उद्घाटन आपले आजोबा शंकरराव बाबुराव मेहेत्रे यांच्या हस्ते करून आजोबा शंकराव मेहत्रे हे गेल्या अनेक वर्षापासून निंबाळे डेअरीचे चेअरमन या पदावर असल्याने हॉटेलला नावही चेअरमनच ठेवून नवीन पिढीसमोर वेगळाच आदर्श निर्माण केला आहे
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजन शिंदे उपस्थित होते तर निंबाळे डेअरीचे चेअरमन शंकराव बाबुराव मेहेत्रे भाजपा कार्यकर्ते मुंबई सुरेश गुप्ता बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका जया ताई चौधरी बाळासाहेब पुंड सुरेश गडगे डॉक्टर वैभव महाले सुखदेव मंडलिक एपीआय प्रवीण मोरे नंदकुमार मेहेत्रे भाऊसाहेब मेहत्रे योगेश मेहेत्रे अक्षय भाऊसाहेब मेहत्रे नितीन शंकरराव मेहत्रे संकेत नितीन मेहेत्रे निखिल नितीन मेहेत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच यावेळी सरपंच उपसरपंच निंबाळे ग्रामस्थ धार्मिक राजकीय सामाजिक व्यावसायिक तसेच मेहेत्रे परिवार पाहुणे नातलग यासह सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी हॉटेलचे चेअरमन चे मालक संकेत मेहत्रे यांनी सांगितले की आम्ही नव्याने सुरू केलेल्या हॉटेल व्यवसायात प्रामाणिकपणा याचबरोबर या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचे जेवण देणार आहोत आमच्याकडे कॉलिटी च्या बाबतीत कोणतीही तडजोड होणार नाही या ठिकाणी फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था केलेली आहे तरी आमच्या हॉटेलला भेट द्यावी व आम्हाला सेवेची संधी द्यावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!