संगमनेर शिबलापूर रोडवर जाखुरी परिसरात भीषण अपघात : संजय खेमनर यांचा दुर्दैवी मृत्यू
संगमनेर
अंभोरे (ता. संगमनेर) येथील संजय म्हतारबा खेमनर (वय अंदाजे ४५) यांचा आज सकाळी सुमारास दहा वाजता झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. संजय खेमनर हे त्यांच्या पत्नीसमवेत काही कामानिमित्त संगमनेरकडे जात होते. दरम्यान, संगमनेर–शिबलापूर रोडवरील जाखुरी शिवारात अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की संजय खेमनर यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर संबंधित अज्ञात वाहनचालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळावर येथील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नागरिकांच्या मदतीने तातडीने पोलिसांना याची खबर देण्यात आली. असून अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.
संजय खेमनर यांच्या निधनामुळे अंभोरे गावात शोककळा पसरली आहे. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस पुढील तपास करत असून लवकरच अपघातास कारणीभूत असलेल्या वाहनाचा शोध घेण्यात येईल, अशी माहिती मिळाली आहे.
