डॉ. श्रीनिवास पोतदार यांना भा. दा. पाटील गुरुजी स्मृती पारितोषिक प्रदान

अकोले प्रतिनिधी

टाकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उच्चविद्याविभूषित, उपक्रमशील पदवीधर शिक्षक तथा केंद्र मुख्याध्यापक डॉ. श्रीनिवास विजय पोतदार यांना अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वतीने सन २०२५ साठी मानद पीएच.डी. (विद्यावाचस्पती) पदवी प्राप्त केल्याबद्दल मा. कै. भा. दा. पाटील गुरुजी स्मृती पारितोषिक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या पारितोषिकासोबत त्यांना १२०० रुपयांचा धनादेश देण्यात आला.
डॉ. पोतदार यांनी आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत अध्यापनासोबतच संशोधन, शैक्षणिक उपक्रम, नवोन्मेषी अध्यापन पद्धती, विद्यार्थी गुणवत्ता वाढ, शिक्षक प्रशिक्षण व शाळा विकास यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या शैक्षणिक योगदानाची दखल घेत हा गौरव प्रदान करण्यात आला आहे.
या गौरव समारंभप्रसंगी अकोले तालुका पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी अरविंद कुमावत, देवठाण बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी अनिल गायकवाड, केंद्रप्रमुख बाळासाहेब आरोटे, रोहिणी खतोडे उपस्थित होते. तसेच अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे चेअरमन बाळासाहेब तापकिर, व्हा. चेअरमन योगेश वाघमारे, संचालक कैलास सारोक्ते, आण्णासाहेब आभाळे, शाखाधिकारी विकास दातीर, प्रकाश मंडलिक, गणेश ठोकळ यांनीही डॉ. पोतदार यांचे अभिनंदन केले.
यावेळी टाकळी केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब फोडसे, डॉ. जनार्दन मोरे, पोपटराव शेवाळे, सरपंच दत्तुभाऊ गरूड तसेच शिक्षणतज्ज्ञ शिवाजी तिकांडे उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी डॉ. पोतदार यांच्या शैक्षणिक वाटचालीचे कौतुक करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
डॉ. श्रीनिवास पोतदार यांचा हा सन्मान अकोले तालुक्यातील शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी केलेल्या त्यांच्या योगदानाची ही योग्य पावती असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!