पिंपरणे येथे छत्रपती दूध संस्थेच्या वतीने  सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांना प्रेरणादिनी अभिवादन

पिंपरणे प्रतिनिधी

संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या प्रेरणादिनी छत्रपती दूध संस्थेच्या वतीने त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण करताना निष्ठा, शिस्त, काटकसर, स्वच्छ चारित्र्य आणि नवनवीन धोरणांची प्रभावी अंमलबजावणी या मूल्यांचा ठसा उमटवणारे भाऊसाहेब थोरात यांचे जीवनकार्य उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरले.
सहकार, शेती, शिक्षण, समाजकारण आणि पर्यावरण या विविध क्षेत्रांत भाऊसाहेब थोरात यांनी दिलेले योगदान महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचा मजबूत पाया ठरले. कार्यकर्ते घडविणे, संस्थात्मक बांधणी करणे आणि समाजहिताला केंद्रस्थानी ठेवून काम करणे ही त्यांची कार्यपद्धती आजही मार्गदर्शक असल्याचे यावेळी वक्त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमापासून प्रसंगी संस्थेचे चेअरमन दिनकर वाकचौरे व संस्थेचे व्हा चेअरमन रावसाहेब ठोंबरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले तसेच संचालक शिवराम वाकचौरे शिवाजी राहिंज किशोर जोर्वेकर कुंडलिक ठोंबरे राहुल निकम  मच्छिंद्र काळे किरण देशमुख ज्योती अभंग छाया वर्पे
या कार्यक्रमास संतोष वाकचौरे, शिवाजी दिघे, अशोक कोल्हे, प्रदीप रक्टे, दत्तू वाकचौरे, अरुण राहिंज, अनिल निकम, शंकर देशमुख, सनी राहिंज, सचिन वाकचौरे, प्रल्हाद ठोंबरे, लहानभाऊ ठोंबरे, राधाकिसन ठोंबरे, नंदू ठोंबरे, संतोष वर्पे, सागर राहिंज आदी मान्यवर उपस्थित होते.
भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!