गरिबीतून घडलेले समाजप्रबोधनाचे दीपस्तंभ : जी. बी. कदम सर”

“शिक्षण, संघर्ष आणि समाजकार्याचा अखंड प्रवास,बहुजन चळवळीचा निःस्वार्थ कार्यकर्ता 
समर्पण, संघर्ष आणि समाजासाठी जगलेले जीवन “
“प्रामाणिक कार्याची शांत मशाल हाडाचा कार्यकर्ता, नितळ मनाचा शिक्षक” 
बहुजन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात आयुष्य समर्पित केलेले गजानन बाबुराव कदम अर्थात जी. बी. कदम सरांचा जन्म दि.१३ जानेवारी १९४४ रोजी संगमनेर तालुक्यातील साकुर या गावी झाला, प्रिंप्री लौकी या गावी त्यांचे बालपण गेले. सरांना त्यांच्यासह एक मोठा भाऊ आणि एक लहान भाऊ असे तिघे भावंडे. आईचा सर्पदंशाने अकस्मात मृत्यू झाल्याने बालपणातच मातृछत्र हरपले, वडिलांनी आई व वडील अशा दोन्ही भूमिकेतून तिघा भावंडांचा सांभाळ केला. कुटुंबाची गरिबीची आणि हलाखीची परिस्थिती असल्यामुळे गावातल्या लोकांसोबत सरांचे वडील आणि मोठा भाऊ खडी फोडायला मजुरीच्या कामाला जायचे. सर शाळेत जाण्या बरोबरच घरच्या दोन गायी सोबत लोकांनी दुष्काळामुळे
सोडून दिलेली जनावरे सुध्दा चारण्याचे काम करायचे. पिंप्रीमध्ये ४ थीपर्यंत शाळा नंतर ५, ६ वी साठी शिबलापूरला आणि ७ वी ला आश्वी बु.मध्ये शाळेत गेले. ७ वी पास झाल्यावर पुढील शिक्षणासाठी संगमनेरला सिद्धार्थ बोर्डिंगमध्ये आले. त्यावेळी ८ वी ते ११वी म्हणजे जुनी मॅट्रिकचे शिक्षण पेटिट हायस्कूल मध्ये घेतले. ११वी पास झाल्याबर पुढील शिक्षणासाठी संगमनेर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. सन १९६६ मध्ये बी. ए. पास झाले. त्यावेळी गावात सरांना पाहिला पदवीधर होण्याचा मान मिळाला. दि.६ जून १९६६ रोजी अर्थात बी.ए. चा रिझल्ट लागण्या अगोदरच रयत शिक्षण संस्थेच्या गणोरे येथील शाळेत शिक्षकाची नोकरी लागली. त्यानंतर सातारा येथील आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन या कॉलेजात नोकरी मिळाली. रयत शिक्षण संस्थेने त्यावेळी पगार देऊन बी एड पूर्ण करून घेतले. साताऱ्याला बीएड शिकत असतानाच बडिलांचे अकस्मात निधन झाले. त्यानंतर एक दिवस थेट ज्ञानमाता विद्यालयात नोकरी करण्याचा प्रस्ताव आला. १९७४-७५ साली ज्युनि. कॉलेज पॅटर्न सुरू झाला आणि ११वी १२ वी च्या वर्गाला शिकवण्यास सुरुवात केली. दरम्यान सरांनी स्वतः चे शिक्षणही चालू ठेवले.
संयुक्त कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना भावांचे संसार उभे करताना मात्र स्वतः ला लग्न करायला खूप उशीर झाला. उशिरा का होईना सरांची सहचारिणी सरांना मिळाली. त्यांचे राहात्याच्या गणेशनगर साखर कारखान्याच्या संचालक असलेल्या गणपतराव पाळंदे यांच्या कमल या मुलीशी लग्न झाले. त्यानंतर सरांना एक मुलगी मनिषा, अमोल आणि अतुल अशी २ मुले झाली. संयुक्त कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असताना भावांच्या मुलां-मुलींचे शिक्षण तसेच इतरही बाचीमध्ये जेथे कमी तेथे स्वतः उभे राहिले आणि स्वतः सह संपूर्ण कुटुंबाला स्थिरस्थावर केले.
कौटुंबिक जबाबदारी काहिशी कमी झाल्यानंतर सरांनी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले. ३४ वर्षे शिक्षण सेबा करणाऱ्या सरांनी या काळात हिंदी, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र अशा तीन विषयात एमए केले. ज्ञांनमाता शाळेत पर्यवेक्षक पद, त्यानंतर बारावीच्या बोर्डाचे राज्यशास्त्र विषयाचे पेपर सेटर, बारावीच्या बोर्डाचे चीफ मोड्रेटर, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे च्या अभ्यास मंडळ सदस्य आशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या.
आपला समाज आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहे यासाठी आपल्याला काही तरी केले पाहिजे या हेतूने सरांनी पुढाकार घेऊन १९९१ मध्ये संगमनेरात कमलाकर सर आणि काही कार्यकर्त्यासोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पतसंस्थेची स्थापना करण्यात मोठा बाटा उचलला. त्यानंतर बरीच वर्षे चेअरमन व नंतर शेवटपर्यंत संचालक म्हणून त्यांनी काम केले, त्याचबरोबर ज्ञानमाता विद्यालय व कॉलेज सेवकांची पतसंस्था स्थापन करण्यात पुढाकार घेतला. त्याचबरोबर विद्यालय व कॉलेज सेवकांची गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यात सिंहांचा वाटा उचलला.
अहमदनगर जिल्हा मागासवर्गीय
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघामध्ये उपाध्यक्ष पदावर काम करत असताना त्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर अनेक वेळा लढा दिला. मंडल आयोगासाठीच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला. तसेच बामसेफ सारख्या संघटनां सोबतच्या कार्यातसुध्दा सक्रिय सहभाग घेतला. सरांनी बहुजन समाज पक्षासोबत काम केले. त्याचसोबत सरांनी एकदा नगरपालिका तसेच एकदा बहुजन समाज पक्षाच्या चिन्हावर आमदारकीची निवडणूक लढवली.
मुळात गरिबीची जाणीव असल्याकारणाने खेडेगावातून येणाऱ्या मुलामुलींना शिक्षणा साठी जी
जमेल ती मदत देऊन सरांनी प्रोत्साहन देण्याचे कम केले. विवीध पुरस्काराने सन्मानित
शैक्षणिक व सामाजिक कार्यात योगदान दिल्याने सरांना विविध संस्था, संघटनांच्या वतीने विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि जेष्ठ साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते सरांचा मोठा सन्मान देखील झाला होता. नागसेन जीवन गौरव पुरस्कार, स्वाभिमानी धम्म परिषद हरेगाव द्वारा स्वाभिमानी धम्म पुरस्कार, परिवर्तन विचार मंच संगमनेर द्वारा प्रबोधन पुरस्कार तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान संगमनेर द्वारा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत केले गेले.
कदम सर हे बाईट वृत्तीच्या लोकांबद्दल सुध्दा बाईट विचार न करणारे इतके नितळ मनाचे व्यक्ती होते. कदम सरांनी सकारात्मकपणे कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक, आर्थिक तसेच राजकीय क्षेत्रात पुढाकार घेऊन कार्य केले. हे करताना त्यांनी भरपूर माणसे जोडली. महत्वाचे म्हणजे सरांना कुठलेच व्यसन नव्हते. सर फक्त सामाजिक कामात लोकांच्या संपर्कात व्यस्त राहायचे, बहुतेक तेच त्यांचे व्यसन होते.
अपयशाची चिंता न करता न हरता न झुकता सकारात्मकपने सातत्यपूर्ण कार्य करत राहिले. त्यांनी सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय अशा सर्वच स्तरावर व्यापक दृष्टिकोनातून कार्य केले. कधी प्रसिद्धीचा हव्यास नाही, कधी चमचेगिरी, सत्ताधाऱ्यांची हाजी हाजी करणे नाही. ते फक्त सरळमार्गी आणि प्रामाणिकपणे काम करत राहायचे त्यामुळे ते हाडाचे कार्यकर्ते असले तरी पूर्णतः दुर्लक्षित राहिले. असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आपल्यातून गेले ही कदम कुटुंबाची व समाजाची मोठी हाणी झाली आहे. आज त्यांचा जलदान विधी आहे त्यानिमित्त त्यांच्या कर्तृत्ववान स्मृतीस विनम्र अभिवादन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!