झोळेकर परिवाराची आईच्या वाढदिवसानिमित्त टाकळी शाळेस पुस्तकांची महान भेट

टाकळी अकोले –

अकोले पंचायत समितीतील विशेष शिक्षक कैलास झोळेकर यांनी नुकताच आपल्या मातोश्री लिलाबाई भाऊसाहेब झोळेकर उर्फ पाटलीणबाई यांचा ८० वा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला. या निमित्ताने त्यांनी शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी, उंचखडक खुर्द, औरंगपूर, अकोले मुले, नवलेवाडी या शाळांना वाचनीय पुस्तकांची भेट देवून एक आदर्श व स्तुत्य उपक्रम राबवला. अकोले येथे संपन्न झालेल्या या दिमाखदार सोहळ्यास मुख्य अतिथी म्हणून अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. किरण लहामटे उपस्थित होते. याशिवाय महाराष्ट्र कृषक समाजाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मनकर, राष्ट्रसंत पूज्य ज्ञानेशानंद शास्त्री, अकोले तालुका पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी अरविंद कुमावत, राजेश पावसे, नगरसेविका प्रतिभा मनकर, भास्कर वाळुंज, संपतराव नाईकवाडी, लक्ष्मण शेणकर तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर व शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी सुनिताताई कातोरे यांच्या सुश्राव्य प्रवचनाचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे औचित्य साधून संयोजकांनी कर्तृत्ववान मातोश्री लिलाबाई झोळेकर यांचा संघर्षमय जीवन प्रवास चित्रफितीतून उलगडून दाखवला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. डी.‌ वाकचौरे यांनी केले.‌ टाकळी शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तकांची ज्ञानरूपी भेट दिल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक डॉ.‌श्रीनिवास पोतदार, सहशिक्षक संजय देशमुख, दत्तात्रय देवगिरे व संगिता धिंदळे यांनी झोळेकर परिवाराचे विशेष आभार मानले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!