श्री निवृत्ती नामदेव काकड यांच्या सहस्रचंद्र दर्शन व अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन
संगमनेर
संगमनेर तालुक्यातील कनोली येथील ज्येष्ठ नागरिक, आदर्श व्यक्तिमत्त्व व समाजाभिमुख कार्यकर्ते श्री निवृत्ती नामदेव काकड पाटील यांच्या सहस्रचंद्र दर्शन सोहळा तसेच अभिष्टचिंतन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा मंगलमय कार्यक्रम बुधवार दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता पिंपरणे येथील ऋद्धी-सिद्धी मंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे.
कुटुंबप्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडताना समाजात आपला वेगळा ठसा उमटवणारे श्री निवृत्ती काकड पाटील यांनी आयुष्यभर कष्ट, प्रामाणिकपणा, साधेपणा आणि समाजसेवेचा आदर्श जपला आहे. त्यांच्या जीवनप्रवासाचा गौरव करण्यासाठी काकड पाटील परिवार व आप्तेष्टांनी या सोहळ्याचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमानिमित्त सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. भागवताचार्य माऊली महाराज कोठुळे (भिवंडी) यांचे जाहीर हरिकीर्तन आयोजित करण्यात आले आहे. त्यांच्या रसाळ वाणीतून भक्ती, संस्कार आणि अध्यात्मिक संदेशाचा लाभ उपस्थितांना मिळणार आहे. त्यामुळे धार्मिक वातावरणात हा सोहळा अधिक मंगलमय होणार आहे.
कार्यक्रमासाठी राधाकिसन निवृत्ती काकड , बाबासाहेब निवृत्ती काकड , सौ. मीना भागवत डोंगरे, सौ. सुगंधा रोहिदास डोंगरे, सौ. तेजल प्रमोद शिंदे, सौ. सुमन भास्कर खुळे, गंगाभाऊ कमल लक्ष्मण ढमाले, सौ. शकुंतला भाऊसाहेब नालकर, सौ. रत्नबाई रामदास कासार, सौ. तेजस्वी जयेश ढोकरे आदींसह समस्त काकड परिवार व ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत.
गावातील ज्येष्ठ व्यक्तीचा गौरव होत असल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संस्मरणीय सोहळ्यास नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभाशीर्वाद द्यावेत, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
