इंदोरीकर महाराजांच्या चौकशीची मागणी; सामाजिक कार्यकर्ते आत्माराम देशमुख यांचे पालकमंत्र्यांसह प्रशासनाला निवेदन

संगमनेर प्रतिनिधी :

पिंपरणे येथील सामाजिक कार्यकर्ते आत्माराम गजानन देशमुख यांनी प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर देशमुख यांच्या संदर्भात सीआयडीमार्फत चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी अहिल्यानगर तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिले आहे.

निवेदनात देशमुख यांनी समाज प्रबोधनाच्या नावाखाली होत असलेल्या कथित भोंदूगिरीला आळा घालण्याची मागणी केली असून, काही मुद्द्यांची चौकशी करण्याची विनंती प्रशासनाकडे केली आहे. तसेच कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून मिळणारे मानधन, आर्थिक व्यवहार याबाबतही चौकशी व्हावी, अशी भूमिका त्यांनी निवेदनातून मांडली आहे.

निवेदनात पुढे संगमनेर जिल्ह्याच्या मागणीचा उल्लेख करत, विविध सामाजिक व प्रशासकीय विषयांवरही लक्ष वेधण्यात आले आहे. शासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता सत्य परिस्थितीची चौकशी करावी आणि योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, निवेदनातील आरोपांबाबत संबंधितांची अधिकृत प्रतिक्रिया उपलब्ध झालेली नाही. प्रशासनाकडून यावर काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!