गौतमी पाटील च्या लावणी कार्यक्रमात पहिल्यांदाच अनपेक्षित घडलं ; सगळीकडे होतीय चर्चा
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमातून नेहमी वाद आणि राडे होण्याच्या बातम्या समोर येत असताना आता मात्र वेगळंच काहीस घडलं आहे. नेमकं काय घडलं पाहा…
लोकवेध live न्यूज 
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गौतमीचा मोठा चाहता वर्ग आहे.छोट्या गावातही गौतमी पाटीलच्या डान्सची क्रेझ पाहायला मिळते.
   लावणी क्वीन म्हणून  गौतमी पाटील ओळखली जाते. मागच्या वर्षभरात गौतमी पाटील हे नाव चांगलंच चर्चेत आलं आहे. गौतमीला पाहण्यासाठी तुफान गर्दी होते. तिच्या कार्यक्रमात चाहत्यांचा गोंधळ होतो. कार्यक्रमात वाद आणि राडा यामुळे ती कायमच चर्चेत असते.  गौतमीला फॉलो करणाऱ्यांची आणि कार्यक्रमांना गर्दी करण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गौतमीची लावणी अश्लील असल्याचा आरोप करत तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. पण आता पुन्हा तिच्या नृत्याने महाराष्ट्रातील रसिकांना वेड लावलं आहे. पण गौतमी पाटीलच्या कार्यक्रमातून नेहमी वाद आणि राडे होण्याच्या बातम्या समोर येत असताना आता मात्र वेगळंच काहीस घडलं आहे.
नेमकं काय घडलं पाहा
ग्रामीण भागात यात्रा-जत्रा अशा कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.  असंच एका ठिकाणी गावच्या यात्रेनिमित्त गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं घडलं.
खेड तालुक्यातील मोहितेवाडी येथे गावच्या यात्रा उत्सवानिमित्ताने गौतमी पाटीलचा लावणी नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी तिच्या कार्यक्रमात फक्त तरुणांनीच नाही तर गावातल्या तरुणींनी देखील ठेका धरला होता. विशेष म्हणजे तिच्या या कार्यक्रमात कोणताही गोंधळ झाला नाही.  गौतमी पाटीलच्या आदाकारीवर तरुणाईसह गावच्या महिला तरुणी चांगलीच दाद दिली.
गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटलं कि राडा आलाच मात्र मोहितेवाडीत गौतमीचा कार्यक्रम विनाविघ्न पार पडला.
तरुणाईसह महिला,तरुणी,चिमुकली मुलं यांनी मोठ्या संख्येने गौतमीच्या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी प्रेक्षकांनी गौतमीच्या आदाकारीला भरभरुन प्रतिसाद देत प्रेक्षक बेभान होऊन थिरकले आहेत,गौतमीच्या कार्यक्रमांमध्ये गोंधळ घालण्याचे प्रकार होत असताना  हा कार्यक्रम विनाविघ्न पार पडला आणि प्रेक्षकांनीही गौतमीच्या कार्यक्रमांचा मनसोक्त आनंद घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!