स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याकडे सकारात्मकतेने बघावे – डॉ.उमा कुलकर्णी

 

लोकवेध live न्यूज 

पिंपळगाव नाकविंदा / सचिन लगड 

 

सुप्रकाशिता स्वयं सहाय्यता समूह आयोजित मार्गदर्शन शिबिरात डॉक्टर उमा कुलकर्णी यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना स्त्रियांचे आरोग्य या विषयावर सखोल माहिती दिली. आपल्या कुटुंबासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याकडे तेवढ्याच सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते .त्यातून अनेक शारीरिक व्याधी आणि समस्या निर्माण होत असतात. महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी दिवसातील दोन तास स्वतःसाठी वेळ देण्याचे आवाहन त्यांनी केले. व्यायाम आणि प्राणायाम दररोज करणाऱ्या व्यक्तींना उत्तम आरोग्य लाभत असते. स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी दिवसातील किमान दोन तास स्त्रियांनी स्वतःसाठी राखून ठेवले पाहिजे. प्राणायाम व ध्यानधारणा यामुळे मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. पाणी ही शरीराची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. प्रत्येकाच्या शरीराला त्यांच्या क्षमतेनुसार कमी अधिक पाणी लागते. शरीराच्या गरजेनुसार व मागणीनुसार पाणी पिण्याचा सल्ला त्यांनी यावेळी उपस्थित महिलांना दिला. शरीर सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार आणि विहार यांचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. सकस आणि समतोल आहार घेण्यावर भर दिला पाहिजे. जेवण ठरलेल्या वेळेवर आणि पोटभर करावे. कसदार आणि जीवनसत्व युक्त आहार घेतल्याने शरीराची वाढ उत्तम रीतीने होते आणि बाळंतपणात होणारा त्रास कमी होतो. आरोग्यदायी जीवनासाठी दररोज व्यायाम ही शरीराची गरज आहे. स्त्रियांनी आपल्या शरीराला झेपेल असा व्यायाम नक्की करून दररोज न चुकता व्यायाम केला पाहिजे. मार्गदर्शन शिबिरासाठी सूप्रकाशिता समूहातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समूहाच्या अध्यक्षा शालिनी वाळके ,सचिव – निलिमा साठे ,समूहाचे सदस्य सीमा नवले , भारती कदम ,मनीषा कदम, रेखा बनसोडे,विशाखा सावंत ,कामिनी भागवत ,नंदा मोहटे ,माधुरी शिंदे , मनीषा काळे ,मीना धुमाळ ,कविता सूर्यवंशी , शितल आरोटे या सर्वांनीच विशेष योगदान दिले.विशाखा सावंत यांनी सर्वांचे स्वागत आणि पाहुणचार केला .कार्यक्रमाचे प्रास्ताविक समूहाच्या सदस्या कामिनी भागवत यांनी केले. आभार सीमा नवले यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!