अँड.एम.एन.देशमुख महाविद्यालयात राज्यस्तरीय वादविवाद व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

लोकवेध live न्यूज 

पिंपळगाव नाकविंदा/प्रतिनिधी-सचिन लगड 

 

ॲड.मनोहरराव नानासाहेब देशमुख कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय राजुर, ता-अकोले,जिल्हा अ.
नगर येथे दि.५ एप्रिल २०२३ रोजी राज्यस्तरीय वादविवाद व दि. ६ एप्रिल २०२३ रोजी वक्तृत्व स्पर्धा संपन्न होणार असून या स्पर्धेचे उद्घाटन दि ५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० वा. मा.सुरेशजी कोते (कार्यकारी संचालक लिज्जत पापड उद्योग समूह पुणे) यांचे हस्ते होणार असून अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख हे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून टी.एन.कानवडे ( सचिव सत्यनिकेतन संस्था राजूर), मिलिंद उमराणी ( संचालक
सत्यनिकेतन) , डॉ.किरण उमराणी, श्री प्रवीण
कोंडार, सत्यनिकेतन संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत अशी माहिती महाविद्यालयातील वादविवाद व वक्तृत्व विभाग प्रमुख डॉ.पी.टी करंडे यांनी दिली आहे. या होणाऱ्या राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचा विषय “ऑनलाइन शिक्षण पद्धती शैक्षणिक गुणवत्ता वाढीस पूरक आहे किंवा नाही ” हा असून वक्तृत्व स्पर्धेचे विषय १) कौशल्यपूर्ण शिक्षण काळाची गरज २) पर्यावरणीय बदल व आव्हाने ३) प्रेरणादायी गाडगेबाबा हे आहेत.या स्पर्धांमध्ये कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील संघ सहभागी होऊ शकतील तसेच विजयी संघाना फिरता स्मृती चषक व
वैयक्तिक रोख रक्कम देण्यात येईल तरी जास्तीत जास्त संघांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आव्हान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.वाय देशमुख आणि संयोजन समितीने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!