ॲड.एम.एन.देशमुख महाविद्यालयात राज्यस्तरीय वादविवाद व वक्तृत्व स्पर्धा संपन्न.

लोकवेध live न्यूज 
पिंपळगाव नाकविंदा / सचिन लगड

 

राजूर येथील ॲड. एम.एन.देशमुख कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात दि.५ व ६ एप्रिल रोजी कै.होनाजी तुकाराम कोंडार स्मृतीचषक वादविवाद व कै. डॉ. माधवराव दिगंबर उमराणी स्मृतीचषक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या.या दोन्ही स्पर्धांचे फिरते स्मृती चषक अहमदनगरच्या न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे विद्यार्थी कु. महेश उशीर व अनिकेत डमाळे या संघाने जिंकले. तर वादविवाद स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक (रु.३००१) देखील याच महाविद्यालयातील विद्यार्थी कु .महेश उशीर याने तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक विभागून (रु.२५०१) अनिकेत डमाळे व निलेश शिरसागर, अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालय, अकोले, यांना मिळाले. तृतीय क्रमांक पारितोषिक (रु.२००१), पवन खाडे, ॲड. एम. एन. देशमुख महाविद्यालय, राजुर, यांनी पटकाविले.तर वक्तृत्व स्पर्धेचे वैयक्तिक प्रथम क्रमांक(रू .३००१) चे पारितोषिक अनिकेत डमाळे,द्वितीय क्रमांक पारितोषिक (रू.२५०१) नितीन गागरे, तृतीय क्रमांक विभागून (रू.२५०१) महेश उशीर आणि अक्षता वडावणीकर, यांना मिळाले.

अशी माहिती देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भाऊसाहेब देशमुख यांनी दिली.पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी डॉ. किरणजी उमराणी आणि श्रीमती मंगलताई कोंडार यांचे हस्ते विजयी झालेल्या स्पर्धकांना पारितोषिके प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी डॉ.किरणजी उमराणी व कै. होनाजी कोंडार यांच्या स्नुषा मंगलताई कोंडार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून दीपक पाचपुते व डॉ.डी.के. गंधारे यांनी व वादविवाद स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. लक्ष्मण घायवट व प्रा. बी.एम.पवार यांनी काम पाहीले.या कार्यक्रम प्रसंगी परिक्षक दीपक पाचपुते यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन करताना ” स्पर्धेतील सहभागामुळे आपल्यामध्ये असणाऱ्या क्षमतांची जाणीव होऊन सुधारणा करता येते. अपयशातूनच पुढे यशाची पायरी चढता येते “असे प्रतिपादन केले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन वादविवाद व वक्तृत्व मंडळाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. पंढरीनाथ करंडे यांनी केले तर सूत्रसंचलन प्रा.अरुण सातपुते यांनी केले. या प्रसंगी डॉ. गिते, प्रा. परते, सर्व स्पर्धक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!