ॲड.एम.एन.देशमुख महाविद्यालयात पारितोषीक वितरण समारंभाचे आयोजन.
प्रसिद्ध गायिका वर्षाताई एखंडे यांच्या हस्ते होणार वितरण.
लोकवेध live न्यूज
पिंपळगाव नाकविंदा / सचिन लगड
अकोले तालुक्यातील राजूर येथील ॲड.एम.एन.देशमुख महाविद्यालयात दिनांक २९ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० वा.वर्षाताई एखंडे ( प्रसिद्ध गायिका व ” मी होणार सुपरस्टार फेम” स्टार प्रवाह दूरदर्शन* ) यांचे शुभ हस्ते व ॲड.एम.एन.देशमुख ( अध्यक्ष, सत्यनिकेतन संस्था राजूर ) यांचे अध्यक्षतेखाली वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण समारंभ होणार असून गुणानुक्रमे प्रथम आलेल्या व विशेष कामगिरी केलेल्या बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली जाणार आहेत.अशी माहिती प्राचार्य प्रोफेसर डॉ.भाऊसाहेब देशमुख यांनी दिली आहे.या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून एम. एल. मुठे ( विश्वस्त सत्यनिकेतन संस्था), विवेकजी मदन ( कोषाध्यक्ष सत्यनिकेतन संस्था), टी.एन.कानवडे ( सचिव सत्यनिकेतन संस्था), डॉ.निता भारमल ( प्रसिद्ध डॉक्टर मुंबई), चिमणराव देशमुख( सी. ई. ओ.मुंबई), सत्यनिकेतन संस्थेचे सर्व संचालक व पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत.या कार्यक्रम प्रसंगी गायिका वर्षा एखंडे आपली गीते सादर करणार आहेत. तरी या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष प्रा. बी. एच. तेलोरे व कला मंडळ प्रमुख प्रा.व्ही.बी.येलमामे यांनी केले आहे. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. विकास नवले, प्रा. शाळीग्राम, डॉ.ननावरे, व प्राध्यापक व कर्मचारी वृंद प्रयत्नशील आहेत.
