क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुलें मुळे समतेची शिकवण – अर्चना रोहम
पिंपरणे मध्ये महात्मा फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांनी सर्वप्रथम शेतकरी, शोषित, वंचित यांच्या प्रश्नांना वाचा फोडून समतेसाठी लढा दिला. त्यांचे जिवनकार्य हे सर्व भारतीयांना सदैव प्रेरणादायी आहे. उपेक्षित वर्गाला गुलामीच्या जोखडातून मुक्त करुन पुरोगामी विचार देणाऱ्या क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुलेंमुळे देशाला समतेची शिकवण मिळाली असल्याचे प्रतिपादन ग्रामपंचायत महिला सदस्य अर्चना रोहम यांनी केले आहे.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी राजहंस दूध संघाचे संचालक रवींद्र रोहम, सरपंच नारायण मरभळ, उपसरपंच मिनीनाथ जोर्वेकर, दिनकर वाकचौरे, मा उपसरपंच अजित देशमुख, संजय बागुल, गंगाराम वाकचौरे, दिनकर ठोंबरे, निलेश बागुल, अर्चना रोहम सुधीर रोहम, बाळासाहेब निकम, निलेश चत्तर, भीमा राहिंज नितीन बागुल सुरेश साळवे प्रदीप मांडे उपस्थित होते.
यावेळी प पू गगनगिरी महाराज विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांच्या हस्ते प्रतिमेला अभिवादन करण्यात आले त्यावेळी सचिव कैलास काळे, सुरेश ठोंबरे ,प्राचार्य मुकुंद डांगे आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख संजय बोरसे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सुनीता अस्वले मॅडम मंदाकिनी मोदड मॅडम, प्रतिभा दुर्गुडे मॅडम, मंदादेवी गवारी मॅडम,प्रदीप बागुल सर, अनिता मुरडनर मॅडम, आधी उपस्थित होते

