क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांच्यामुळे स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार — डॉ. जयश्रीताई थोरात

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुलेंमुळे  समतेची शिकवण

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांनी सर्वप्रथम शेतकरी,शोषित, वंचित यांच्या प्रश्नांना वाचा फोडून समतेसाठी लढा दिला. त्यांचे जिवनकार्य हे सर्व भारतीयांना सदैव प्रेरणादायी आहे. उपेक्षित वर्गाला गुलामीच्या जोखडातून मुक्त करुन स्त्रियांच्या शिक्षणाचा पुरस्कार करून पुरोगामी विचार देणाऱ्या क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुलेंमुळे समतेची शिकवण मिळाली असल्याचे प्रतिपादन कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात  यांनी केले आहे.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विधिमंडळ पक्ष नेते  आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालय येथे त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी समवेत सुभाष सांगळे, प्रा बाबा खरात, दत्तात्रय कोकणे ,शतानंद खामकर, रामनाथ कु-हे, बाळासाहेब पवार, दिलीप जोशी, तानाजी आहेर, ॲड. अशोक हजारे, तात्याराम कुटे आदींसह विविध पदाधिकारी  उपस्थित होते.


यावेळी बोलताना कॅन्सर तज्ञ डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, महात्मा ज्योतिबा फुले हे आधुनिक महाराष्ट्राचे जनक मानले जात असून समानता व स्त्री शिक्षणासाठी त्यांनी खुप मोठे कार्य केले. शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचे महत्वाचे साधन असून शिक्षणाच्या प्रचारासाठी त्यांनी तत्कालीन जुन्या परंपरा मोडीत काढून सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देवून पहिल्या स्त्रीला शिक्षीका बनविले. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडून ब्रिटीशांपुढे शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.

श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आयुष्यभर झटणाऱ्या महात्मा ज्योतीबा फुले यांनी समतेचा पुरोगामी विचार देशाला दिला. अंधश्रध्दा निर्मुलन,सतीची चालबंदी, केशवपण यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. सामाजिक विषमता नष्ट करुन समाजात समता निर्माण करण्याचे मोठे काम त्यांनी केले असून प्रतिगामी शक्तींचे विचार मोडून काढण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांचे समतेचे पुरोगामी विचार तरुणांनी आचारणात आणले पाहिजे असे ही त्या म्हणाल्या

प्रा. बाबा खरात म्हणाले कि, समाजातील अनिष्ठ चाली रिती,रुढी व परंपरा बंद करण्यासाठी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे खुप मोठे योगदान असल्याचे ही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!