वडगाव पान ऍसिड हल्ला प्रकरण : आरोपीला तात्काळ अटक करा, फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून कठोर शिक्षा द्या – शिवसेनेचे निवेदन
संगमनेर प्रतिनिधी :
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीवर झालेल्या भ्याड ऍसिड हल्ल्याच्या घटनेविरोधात संताप व्यक्त करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने संगमनेर पोलीस उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत आरोपीविरोधात कडक कारवाईची मागणी करण्यात आली.
शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन पाराजी कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडी, युवा सेना व इतर अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन दिले. वडगाव पान येथील अल्पवयीन विद्यार्थिनी ईश्वरी डहाळे हिच्यावर एका नराधम युवकाने ऍसिड हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना अत्यंत संतापजनक असून या अमानुष कृत्याला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
निवेदनात करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :
▪️ प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावे
▪️ आरोपीला त्वरित अटक करून कठोर शिक्षा द्यावी
▪️ आरोपीला जामीन नाकारावा
▪️ पीडितेला उत्तम वैद्यकीय उपचार व योग्य नुकसानभरपाई द्यावी
▪️ कुटुंबाला आर्थिक व मानसिक आधार द्यावा
▪️ शाळा, कॉलेज व गावपातळीवर जनजागृती करावी
▪️ ऍसिड विक्रीवर कडक नियंत्रण आणावे
▪️ विद्यार्थी व महिलांच्या सुरक्षेसाठी समन्वय समिती स्थापन करावी
▪️ आरोपीला लपवण्याचा कोणताही प्रयत्न हाणून पाडावा
निवेदन दिल्यानंतर शिवसैनिकांनी पीडित मुलीच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी “शिवसेना पक्ष पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत व सहकार्य करेल,” अशी ग्वाही जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील यांनी दिली.
या घटनेविषयी बोलताना शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमर कतारी म्हणाले की, “अशा भ्याड व नीच प्रवृत्तीमुळे समाजाला काळीमा फासला जात आहे. आरोपीला कठोर शिक्षा करून पीडित मुलगी व तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून दिलाच पाहिजे.”
तसेच तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, शहर प्रमुख अमित चव्हाण, महिला आघाडी उपजिल्हा संघटिका आशाताई केदारी व शितलताई हासे यांनीही सरकारतर्फे पीडितेला आर्थिक मदत देण्याची मागणी केली.
दरम्यान, “पीडितेला न्याय न मिळाल्यास शिवसेना, युवा सेना व महिला आघाडी रस्त्यावर उतरतील,” असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या वेळी श्रीरामपूर तालुकाप्रमुख लखन भगत, कोपरगाव तालुकाप्रमुख भरत मोरे, राहाता तालुका प्रमुख सोमनाथ गोरे, संगमनेर तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, भीमाशंकर पावसे, मनोज जाधव, महिला आघाडी उपजिल्हा संघटिका आशाताई केदारी, वैशाली वढतल्ले, संगीता गायकवाड, शहर प्रमुख अमित चव्हाण, युवा सेना तालुकाप्रमुख अक्षय गुंजाळ, गोविंद नागरे, अमोल डुकरे, दीपक साळुंखे, पप्पू कानकाटे, विजू सातपुते, राजू सातपुते, अशोक बढे, अभी साबळे, मुस्ताक शेख, निखिल पवार, केशव वर्पे, बाळासाहेब घोडके, प्रवीण चव्हाण, त्रिलोक कतारी, रिक्षा सेनेचे बडे माघाडे पवार दिवे तसेच इतर महिला पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
