साईकृपा दूध संकलन केंद्राचे उद्घाटन संपन्न ;
दूध उत्पादकांसाठी आकर्षक योजना सविस्तर वाचा
उच्च शिक्षित तरुणाचे धाडसी पाऊल
पिंपरणे / लोकवेध live न्यूज

संगमनेर तालुक्यातील पिंपरणे जाखुरी नागपूर वाडी या ठिकाणी साईकृपा संकलन केंद्राचे उद्घाटन संपन्न झाले नागपूरवाडी येथील तरुण युवक प्रज्वल नानासाहेब गुंजाळ हे उच्च शिक्षित असून यांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायात उतरून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांनी साईकृपा दुध संकलन केंद्र स्थापन केले आहे दूध व्यवसायामध्ये सध्या सारखे चढउतार पाहता दूध धंदा परवडत नाही खाद्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत तर हे अनेक खर्च दूध धंद्यात आहेत परंतु साईकृपा दूध संकलन केंद्रामार्फत दुधाचे दर स्थिर ठेवून त्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना कसा फायदा मिळेल हे बघितले जाणार आहे त्यासाठी प्रज्वल ने स्वतः दूध व्यवसायात उतरून आपल्याबरोबर शेतकऱ्यांनाही याचा फायदा मिळावा यासाठी साईकृपा दूध संकलन केंद्र स्थापन करून त्याद्वारे जे दूध व्यवसायिक शेतकरी आहेत त्यांना या व्यवसायातून चांगला लाभ मिळणार आहे
दूध उत्पादकांसाठी योजना-

दहा दिवसातच साईकृपा दूध संकलन केंद्राने 1000 लिटर टप्पा पार केला असून साईकृपा दूध संकलनाकडे दूध व्यवसाय काय भरघोस प्रतिसाद मिळत आहे त्यांचा कल पाहून इतर शेतकऱ्यांनी साईकृपा दूध संकलन केंद्रात टाकून आमच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आव्हान प्रज्वल गुंजाळ यांनी केले
