श्री क्षेत्र खिरविरे ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळयाचे आयोजन.

लोकवेध live न्यूज 
पिंपळगाव नाकविंदा / सचिन लगड 

जव हे सकळ सिद्ध आहे,हात चालावया पाय.तया आपले सो हित पाहे,तिर्थ यात्रे जाय चुकु नको.याप्रमाणे वै.ह.भ.प.भगवानदास महाराज दिंडी भजनी मंडळ खिरविरे(ता.अकोले) येथे गोमुख श्री क्षेत्र खिरविरे ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर(उटीचीवारी) पायी दिंडी सोहळयाचे आयोजन केले आहे.
याप्रसंगी ग्रामपंचायतीचे सरपंच गणपत डगळे यांच्या हस्ते विनापुजन,उपसरपंच सुभाष बेणके यांच्याहस्ते तुलसीपुजन,माजी उपसरपंच देवराम हाळकुंडे यांच्या हस्ते कलशपुजन, दुधगंगा पतसंस्थेचे मॅनेजर पंढरी बेणके यांच्या हस्ते झेंडापुजन तर दिनेश शहा यांच्या हस्ते टाळपुजन करण्यात आले.यावेळी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.निवृत्ती काळे,उपाध्यक्ष ह.भ.प. बाळू बेणके, सचिव ह.भ.प.बाळू सुर्यवंशी,सहसचिव ह.भ.प. विठ्ठल सुर्यवंशी,खजिनदार ह.भ.प. काळू बेणके, सहखजिनदार ह.भ.प.नामदेव बेणके, दिंडीचालक ह.भ.प. दत्तात्रय सगर, सहदिंडीचालक ह.भ.प. निवृत्ती डगळे, खंडू डगळे,भानुदास सुर्यवंशी,रामदास बेणके,कमलाकर डगळे, दामु डगळे,अंतुराम काळे,राणू बेणके, लक्ष्मण डगळे,गोपीनाथ डगळे, शांताराम काळे,प्रकाश पराड, पंढरीनाथ बेणके,मंगल सुर्यवंशी,यशोदा वालझाडे, लहानबाई बेणके,नंदाबाई डगळे यांसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.दिंडी वाटचाल दरम्यान ह.भ.प.सुदाम महाराज गायकवाड,हभ.प. नामदेव महाराज बेणके,ह.भ.प.लक्ष्मण महाराज भांगरे,ह.भ.प.निवृत्ती महाराज डगळे,ह.भ.प.पांडूरंग वामन साकुरे,ह.भ.प.दत्तात्रय महाराज सगर यांचे किर्तन होणार असून पंचक्रोशितील सर्व भाविक भक्तांनी सामिल व्हावे तसेच काकडा,भजन,हरीपाठ,भारूड आदी श्रवण सुखाचा लाभ घ्यावा असे ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.निवृत्ती काळे तसेच संचालक मंडळाने आव्हान केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!