मालुंजेत खंडोबा यात्रोत्सव मोठया भक्तीभावात व उत्साहात संपन्न
जिल्हास्तरीय बैलगाडा शर्यतीने यात्रा उत्सवात रंगत
जिल्ह्यातील नामवंत मल्लांची हजेरी
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
येळकोट येळकोट जय मल्हार , सदानंदाचा येळकोट” च्या जयघोषात आणि ढोल ताशांच्या गजरात मालुंजे येथील ग्रामदैवत हनुमान जयंती.. व खंडोबा देवाचा यात्रा उत्सव मोठया भक्तीभावात व उत्साहात पार पडला. चैत्र पौर्णिमा उत्सवानिमित्त हजारो भाविकांनी खंडोबाची देवदर्शन घेतले तसेच विविध धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गडावर भाविकांनी मोठी गर्दी केली होती या ठिकाणी देवाच्या दारी जागरण गोंधळ तळीभंडार नैवद्य कुलधर्म कुलाचार करण्याची प्रथा या दिवशी आहे त्यामुळे दिवसभर गडावर भाविक येत होते खंडोबाच्या जयघोषाने खंडोबा गड दुमदुमून गेला होता
गुरुवारी पहाटे ५ वाजता गावातील भजनी मंडळाने हनुमान मंदीरात भजनाचा कार्यक्रम केला नंतर हनुमान देवाचे पुजन करून जयंती साजरी केली तसेच ग्रामस्थांनी जागृत ग्राम दैवत खंडोबा देवाला दुधाने व पवित्र गंगाजलाने अभिषेक घालुन महा आरती करण्यात आली यावेळी गावचे सरपंच संदीप घुगे यांच्या शुभहस्ते खंडोबाच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला नंतर यात्रौत्सोैव सुरू झाला खंडोबा देवाचे मंदिर उंच डोंगरावर असून मंदिर परिसर अतिशय सुंदर आहे गडावर दिवसभर भाविकांचा दर्शन आणि नवसपुर्ती कार्यक्रम सुरू होता .संपूर्ण यात्रा उत्सव माजी सरपंच संदीप घुगे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले

दुपारी २ वा जिल्हास्तरीय बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रम झाला
सायंकाळी ४ वा मानाच्या काठयांचा कार्यक्रम झाला यावेळी भावीकांनी खोबर भंडाऱ्याची उधळन करीत वाजतगाजत काठ्यांची मिरवणूक काढली यळकोट यळकोट सदानंदाचा येळकोट जय मल्हार गजराने गाव दुमदुमून गेले होते मानाच्या काठयांचे दर्शन घेण्यासाठी महिला पुरूषांनी खुप गर्दी केली होती .सायंकाळी ६ वाजता खंडोबा देवाच्या काठ्यांची मिरवणूक काढून गडावर दर्शनासाठी नेण्यात आल्या.

सालाबाद प्रमाणे पारंपारिक यात्रा उत्सव निमित्त मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली तसेच गाभाऱ्यापर्यंत फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती रात्री ७ ते ८ हनुमान प्रासादिक भजनी मंडळाच्या वतीने संगीत भजनाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री ८वा सुप्रसिध्द गायक छगन चौगुले यांचा संगीत गायनाचा कार्यक्रम झाला. शनिवारी (दि२९) रोजी सायंकाळी ५ ते ४ वाजेपर्यंत कुस्तीचा भव्य आखाडा पार पडला.त्यात ५०० ते ७५०० रुपये ईनामाच्या कुस्त्या पार पडल्या यावेळी 7500 रु मानाची कुस्ती सुचित घुगे मालुंजे आणि अमोल कोल्हे कोपरगाव यांच्यात झाली यात सूचित घुगेने अमोल कोल्हे यास चितपत करत मानाची कुस्ती जिंकली

यात्रा उत्सव सुरळीत आणि यशस्वी पाडण्यासाठी गावच्या नवनिर्वाचित सरपंच सुवर्णा घुगे,मा.सरपंच संदिप घुगे, तंटामुक्ती अध्यक्ष विष्णु घुगे, काशिनाथ सोसे, आनंदराव खरात, सुखदेव खरात, संपत खरात, शशिकांत नागरे स्वप्निल बुरकुल ,योगेश गाभणे, शंकर जोर्वेकर, विजय डोंगरे ,मच्छिंद्र गोसावी, दिनकर घुगे, मारुती नागरे, संदीप गुरुकुल, संदीप सांगळे, दीपक डोंगरे, दगडु नागरे ज्ञानदेव सोसे, संदीप चौधर, आदीनी यात्रा व्यवस्थित पार पडण्यासाठी परिश्रम घेतले
सर्व देणगिदार ग्रामस्थ, मुंबई ,पुणे, नाशिक येथील देणगिदार भाविकांचे सरपंच संदिप घुगे यांनी आभार मानले
