पुनीत सागर अभियान एक प्रभावी उपक्रम – कर्नल संदिप जगताप.
लोकवेध live न्यूज
पिंपळगाव नाकविंदा/ सचिन लगड
वर्तमान केंद्र सरकारने सुरू केलेले पुनीत सागर अभियान पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी अतिशय प्रभावी उपक्रम असून जास्तीत जास्त तरुणांनी यात सहभागी व्हावे असे प्रतिपादन कर्नल संदिप जगताप, ए. ओ.(57 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी.) अहमदनगर यांनी केले. ते 57 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. अहमदनगर,ॲड. एम. एन. देशमुख महाविद्यालय राजूर, सर्वोदय विद्या मंदिर राजूर, मॉडर्न हायस्कूल अकोले आणि अगस्ती महाविद्यालय अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने रंधा फॉल येथे आयोजित पुनीत सागर अभियानात मार्गदर्शन करत होते.

स्थानिक लोकांना ‘स्वच्छ भारत’ बद्दल जागरुकता निर्माण करणे आणि संवेदनशील करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. स्थानिक लोकसंख्येमध्ये आणि भावी पिढ्यांमध्ये समुद्रकिनारे आणि नदी किनारे स्वच्छ ठेवण्याच्या महत्त्वाबद्दल जागरुकता निर्माण करण्याची योजना आहे. एनसीसी कॅडेट्समध्ये एनसीसीचे माजी विद्यार्थी, स्थानिक लोक आणि देशभरातील पर्यटक मोठ्या संख्येने सामील होत आहेत.

रंधा फॉल येथे परिसरात विविध कारणांनी कचऱ्याचे साम्राज्य वाढले होते म्हणून तो परिसर पुनीत सागर अभियान करीता निवडला गेला. चारही विद्यालयाचे मिळून 77 छात्रांनी यात सहभाग नोंदवला.
स्थानिक नागरिकांनी सदर उपक्रमास चांगला प्रतिसाद दिला व अशा पद्धतीचे उपक्रम कायम घेण्यात यावेत अशी भावना स्थानिक नागरिक मच्छिंद्र येडे यांनी व्यक्त केली.
सदर उपक्रम घेण्याकरिता 57 महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी. अहमदनगरचे कमांडींग ऑफिसर कर्नल पंकज साहनी ( सेना मेडल) यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच सुभेदार मेजर बजरंग सिंघ, लेफ्टनंट रोहित मुठे, सेकंड ऑफिसर संजय देशमुख आणि थर्ड ऑफिसर मिनानाथ खराटे यांनी अथक परिश्रम घेतले.
