राज्यघटनेशी छेडछाड करून जातीभेद निर्माण करण्याचे काहींचे काम सुरू = आ थोरात
पिंपरणेत क्रांती युवा मंचच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
पिंपरणे : लोकवेध live न्यूज
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाचे तत्वजपण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. मात्र देशातील काहीजण संविधानाची शपथ घेऊन राज्यघटनेच्या तत्त्वांच्या विरुद्ध विचार मांडून.जाती भेद निर्माण करून राजकारण करत असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी विरोधी भाजपावर केली
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व नील क्रांती युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी सिताराम वर्पे यांसह कारखान्याचे चेअरमन बाबा ओहळ, दूध संघाचे व्हा चेअरमन राजेंद्र चकोर, बापूसाहेब देशमुख, प्राचार्य मुकुंद डांगे,सुधाकरराव रोहम, राजेंद्र देशमुख, रवींद्र रोहम, अरुण देशमुख, दिनकर वाकचौरे, शिवराम वाकचौरे,काका गायकवाड, संजय बागुल, अजित देशमुख, कैलास शेठ काळे, नानासाहेब गुंजाळ, पांडुरंग साळवे,संजय खरात, संतोष नागरे, बंडू वर्पे, भीमाशंकर वर्पे, संजय महाराज देशमुख, किसन पानसरे, राजेंद्र देशमुख, ओंकार सराफ, सरपंच नारायण मरभळ उपसरपंच मिनीनाथ जोर्वेकर, सतीशराव देशमुख,नवनीत देशमुख, किसनराव पानसरे, अण्णासाहेब वाकचौरे, दिनकर ठोंबरे, गंगाराम वाकचौरे, भीमा राहींज, किसन साळवे,संतोष वाकचौरे अजित मांडे, निलेश चत्तर, पोपट साळवे आदी उपस्थित होते.

नील क्रांती युवा मंचच्या वतीने सकाळी रक्तदान शिबिर घेण्यात आले

आ. थोरात म्हणाले की उपेक्षितांच्या उद्धारासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे व प्रत्येक भारतीयाला राज्यघटनेच्या माध्य मातून समतेचा अधिकार मिळवून देणारे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे मानवतेचे मानबिंदू असून चातुरवर्ण व्यवस्थेविरुद्ध प्रथम गौतम बुद्ध यांनी लढा दिला असून हा समतेचा विचार पुढे नेण्या साठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर संघर्ष केला.संत महात्म्यांचे समान तेचे विचार आणि तत्त्वज्ञान त्यांनी राज्य घटनेच्या माध्यमातून दिल देशाला संविधान दिले आहे. मात्र सध्या काहीजण एका समाजाचे राज्य निर्माण करण्याचे विधाने करत आहे ते अत्यंत दुर्दैवी असून सर्वांच्या विकासाचा व समतेचा असलेला राज्यघटनेचा विचार हाच शाश्वत विचार असल्याचे त्यांनी सांगितले

प्राचार्य मुकुंद डांगे की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ज्ञानाचाउपयोग गोरगरीब, दलित ,शोषितांच्या उद्धारासाठी केला आहे. लोकशाहीमुळेच सर्वांसाठीच विकासाच्या वाटा खुल्या झाल्या आहेत. इतिहास ,तत्त्वज्ञान, व अर्थशास्त्र अशा विविध विषयांचे गाढे अभ्यासक असलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य पुढील पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे

. यावेळी गावातील उच्चशिक्षित तसेच उच्च पदावर काम करणारे आकरा जणांना समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

जयंती यशस्वी करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती नीलक्रांती युवा मंच यांनी परिश्रम घेतले

