ॲड.एम.एन.देशमुख महाविद्यालयातील साई कुस्ती केंद्रात कुस्ती मल्ल भरतीचे आयोजन.
मल्लांनी सहभागी होण्याचे आवाहन
लोकवेध live न्यूज
पिंपळगाव नाकविंदा / सचिन लगड

भारतीय खेल प्राधिकरण नवी दिल्ली “मान्यता प्राप्त साई कुस्ती केंद्र राजूर येथील ॲड.एम.एन.देशमुख कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे असून या साई कुस्ती आखाडा अंतर्गत दिनांक २१एप्रिल २०२३ रोजी १४ वर्षाखालील कुस्ती मल्लांची भरती होणार आहे,त्यासाठी भारतीय खेल प्राधिकरणाचे भरती अधिकारी गौरव आर्या (एन.आय. एस.कुस्ती कोच) व हरीश राजोरा ( एन .आय .एस .कुस्ती कोच) उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ.भाऊसाहेब देशमुख यांनी दिली आहे .
या कुस्ती भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांची निवड होईल त्या मुलांना प्रतिमाह १००० /- रुपये व प्रतिवर्षी स्पोर्ट्स किट देण्यात येणार आहे अशी माहिती साई कुस्ती सेंटरचे आंतरराष्ट्रीय पदक विजेते ( एन.आय एस. कुस्ती कोच) तानाजी नरके यांनी दिली आहे. या भरतीसाठी ग्रामपंचायतचा ओरिजनल मूळ जन्म नोंद दाखला, बोनाफाईड सर्टिफिकेट ,आधार कार्ड झेरॉक्स, रेशन कार्ड झेरॉक्स ,दोन पासपोर्ट साईज फोटो ही सर्व कागदपत्रे आवश्यक असून सदरची कागदपत्रे घेऊन इच्छुक कुस्ती मल्लांनी दिनांक २१ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० वा. महाविद्यालयात उपस्थित राहावे व या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा.असे आवाहन प्राचार्य डॉ .भाऊसाहेब देशमुख ,व क्रीडा शिक्षक प्रा. व्ही. बी .नवले (फोन नं 9890776022) टी. डी नरके (9657900303) यांनी केले आहे.
