या गावात तमाशात तरुणांचा धिंगाणा ,पंचवीस जणांवर गुन्हा दाखल

 

संगमनेर  / लोकवेध live न्यूज 

 

अकोले तालुक्यातील तांभोळ येथे तुळजाभवानी यात्रेनिमित्त आयोजित लोकनाट्य तमाशात तरुणांनी हुल्लडबाजी करुन तमाशा बंद पाडला. याप्रकरणी आठ तरुणांसह अज्ञात पंधरा अशा एकूण पंचवीस जणांवर अकोले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यात्रेनिमित्त सुरू असलेल्या तमाशात आरडओरड व गोंधळ करुन तरुणांनी तमाशा बंद पाडला. यात्रा समितीचे अध्यक्ष व सदस्यांना धक्काबुक्की शिवीगाळ केली. तसेच तमाशाच्या रंगमंचावर जाऊन कॅमेरा, वाद्य व इतर साहित्याची तोडफोड करुन नुकसान केले.याबाबत सरपंच जयश्री माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अकोले पोलिसांनी गावातील सुनील भाऊ पवार, विलास अर्जुन मोहिते, राहुल संजय चव्हाण, रोहिदास बाळासाहेब जाधव, जनार्दन ज्ञानेश्वर साळुंखे, अनिल शंकर साळुंखे, तुषार निवृत्ती चव्हाण, सूरज अर्जुन पवार व इतर अनोळखी पंधरा व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, यापूर्वी देखील सरपंच पदाच्या निवडीवेळी असाच गोंधळ झाला होता. त्यावेळीही पोलिसांनी सौम्य लाठीमार करुन जमाव पांगविला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!