प्रवरा बँके च्या संगमनेर शाखेत 38 लाखाची फसवणूक… 9 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
संगमनेर / लोकवेध live न्यूज
प्रवरा बँकेचा अधिकृत सराफ जगदीश शहाणे याचा प्रवरा सहकारी बँकेतील 38 लाख 44 हजार 422 रुपयांचा फसवणुकीचा घोटाळा समोर आला आहे. या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात शहाणे याच्यासह नऊ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाखा अधिकारी सुदाम शेजवळ यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात खाली दिल्याप्रमाणे 1) भानुदास यशवंत ढगे 2) गोरक्ष राधाकृष्ण गाडेकर 3) सुधीर रावसाहेब घुगे 4) मारुती अण्णासाहेब मंडलिक 5) शरद मारुती पर्वत 6) राहुल ज्ञानेश्वर गुरुकुले 7) सारिका सतीश पोटे 8) सुशील सुरेश रोहम 9) सुवर्ण मूल्यांकनकार जगदीश लक्ष्मण शहाणे या नऊ जनं विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या संदर्भात बँकेचे संगमनेर शाखेचे व्यवस्थापक: सुदाम किसन शेजवळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बँकेने नेमलेल्या अधिकृत मूल्यांकनकार जगदीश शहाणे याच्यामार्फत कर्जदाराने दिलेल्या सोन्याची शुद्धता तपासणी करून ते खरे किंवा खोटे याची खात्री केल्यावर सोन्याचे मूल्यांकनाचे तपासणी व ते खरे असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर बँकेच्या नियमानुसार सोने तारण कर्ज वितरित करण्यात आले आहे. बँकेने सोन्याच्या मूल्यांकनाचे काम करण्यासाठी बँकेच्या अधिकृत सराफ जगदीश लक्ष्मण शहाणे (रा.मालदाड रोड, संगमनेर) यांची नेमणूक केली होती.
त्यामुळे बँकेत कर्जासाठी तारण ठेवलेले सोने खोटे निघाले तर त्याबाबत मूल्यांकनकार व सोनेतारण कर्जदार यांना जबाबदार धरण्यात येते.
या अगोदर तीन बँकांमध्ये झालेले सोनेतारण प्रकरणे खोटी निघाली असून या बँकांमध्ये जगदीश शहाणे हा अधिकृत सराफ असल्याने त्याच्या व कर्जदाराविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाल्यानंतर बँकेने 40 सोनेतारण कर्जदारांच्या दागिन्यांची तपासणी करण्याचे ठरविले होते. तपासणी अंती आठ सोनेतारण कर्जदारांनी बँकेकडे गहाण ठेवलेले सोने
खोटे असल्याचे आढळून आले.
फेब्रुवारी 2022 पासून कर्ज घेतेवेळी तारण म्हणून बँकेत खोटे सोने ठेवून तसेच खोटे सोने खरे असल्याचे मूल्यांकन प्रमाणपत्र शहाणे यांनी दिले
सोबतच्या आठ कर्जदार आरोपींसह बँकेला देऊन बँकेचा विश्वास संपादन करत 38 लाख 44 हजार 422 रुपयांची फसवणूक केली. अशा आशयाची फिर्याद दिल्याने शहर पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात फसवणुकीसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सातपुते करीत आहेत.
