बाजार समिती ची फायनल ची लढत सुरू ; आजी-माजी महसूल मंत्री थोरात विखे समर्थकांमध्ये निवडणूक रंगणार! 18 जागांसाठी 45 जण निवडणूक मैदानात 
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून थोरातांनी त्यांनी खुले आव्हान दिले आहे. स्वतंत्र पॅनेल तयार करून बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी उमेदवारांना मैदानात उतरविले आहेत.
संगमनेर / लोकवेध live न्यूज 
 संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून आजी-माजी महसूल मंत्री थोरात विखे समर्थकांमध्ये निवडणूक रंगणार आहे. 18 जागांसाठी 45 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून एकही जागा बिनविरोध होऊ शकलेली नाही. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून कृषी पतसंस्था मतदारसंघातून सर्वसाधारण गटात 18 महिला राखीव गटात 4. इतर मागास प्रवर्ग गटामध्ये 2, विमुक्त जाती भटक्या जमाती गटामध्ये 2, ग्रामपंचायत मतदार संघातून सर्वसाधारण जागेवर 6. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून 2, दुर्बल घटक प्रवर्गातून 2, व्यापारी अडते मतदार संघातून 6 व हमाल मापारी मतदारसंघातून 3 उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत. जवळपास सर्वच जागांवर विरोधकांना उमेदवार मिळाल्याने एकही जागा बिनविरोध होऊ शकलेली नाही. काही जागांवर सरळ लढत होत आहे.  
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीवर राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे एक हाती वर्चस्व आहे.
छाननीनंतर निवडणूक रिंगणात 99 उमेदवार
शिल्लक राहिले होते माघारीपर्यंत यातील
बहुतेकांनी माघार घेतल्याने शेवटच्या दिवशी 18 जागांकरिता 45 उमेदवार निवडणूक रिंगणात
असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव कांदळकर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सतीश गुंजाळ यांनी दिली आहे.
मतदार संघनिहाय उमेदवार खालील प्रमाणे:-
कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था मतदारसंघ शेतकरी प्रतिनिधी:
डॉ. अशोक वामनराव इथापे, सुरेश रामचंद्र कान्होरे,सतीश विश्वनाथ खताळ, शंकर हनुमंता खेमनर, अॅड. श्रीराम अरविंद गणपुले, गीताराम दशरथ गायकवाड, विकास शांताराम गायकवाड, मनीष सूर्यभान गोपाळे, भीमराज नामदेव चत्तर, भाऊराव रामराव देशमुख, योगेश मधुकर देशमुख, कैलास बाळासाहेब पानसरे, काशिनाथ रभाजी पावसे, कचरू भाऊपाटील वारुक्षे, रमेश नामदेव शिंगोटे, बाळासाहेब लहानु शेटे, यशवंत कारभारी शेळके व विजय विठ्ठल सातपुते.
सोसायटी मतदार संघ महिला राखीव:-
अंजनाबाई पुंजा दिघे, रोहिणी किशोर निघूते.
दिपाली भाऊसाहेब वर्षे व रुक्मिणी शिवाजी
साकूरे
सोसायटी मतदार संघ इतर मागासवर्गीय:-
शरद ज्ञानदेव गोर्ड व सुधाकर पुंजाजी ताजने
सोसायटी मतदार संघ विमुक्त जाती भटक्या जमाती:-
अनिल शिवाजी घुगे व संदीप भाऊसाहेब घुगे.
ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघ:-
जनार्दन म्हातारबा आहेर, संतु गंगाधर कुटे, दत्तात्रय केशव गुंजाळ, संदीप भास्करराव देशमुख, अरुण तुळशीराम वाघ व सखाहरी बबन शरमाळे,
ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ:-
 संजय दादा खरात व महादू जानकु गोंधे.
ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मतदार संघ:-
निलेश बबन कडलग व संजय दत्तात्रय पावसे,
व्यापारी मतदारसंघ:-
मनसुख शंकर भंडारी, अजीम गुलाम हुसेन शेख,
खलील नवाब शेख, नबी पापा शेख, निसार गुलाब
शेख व रफिक पापा (बेपारी) शेख.
हमाल मापाडी मतदारसंघ:-
सचिन बाळकृष्ण कर्पे, महेंद्र रखमा गुंजाळ व सोमनाथ तुकाराम दिघे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!