पेटीट विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

 

संगमनेर / लोकवध live न्यूज

 

शहरातील सर डी .एम पेटीट विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य एच .आर मोकळ यासह व्यासपीठावर शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. सुलभा पाटील , इन्चार्ज प्रा. गुलाब गायकवाड , प्रायमरी विभागाच्या मुख्याध्यापिका थोरात मॅडम , सत्र प्रमुख शरद जोशी , क्रीडा शिक्षक मदन जेधे सेवाजेष्ठ सेवक दत्तात्रय कुळधरण आदी उपस्थित होते. प्रारंभी ३१ मे अखेर सेवानिवृत्त होत असलेले ज्येष्ठ सेवक दत्तात्रय कुळधरण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन सर्वांतर्फे ध्वजाला मानवंदना देण्यात आली. आपल्या अध्यक्षीय व संदेश पर भाषणात प्राचार्य मोकळ सर म्हणाले की , १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी अनेक शूरवीरांनी बलिदान दिले अशा या शूर वीरांना यावेळी मानवंदना देण्यात आली. महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा याप्रसंगी उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्राचार्य एच आर मोकळ सर यांनी दिल्या. यावेळी महाराष्ट्र गीताचा उपस्थित सर्वांनी श्राव्यनंद घेतला . या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सत्र प्रमुख प्रकाश वनम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!