सतरा हजाराची लाच घेताना पंतप्रधान आवास योजनेच्या अधिकाऱ्यास अटक ; नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
संगमनेर : लोकवेध live न्यूज 
संगमनेर शहरातील मोगलपूरा येथील लाभार्थ्याकडून पंतप्रधान घरकुल योजनेतील नगरपालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या घरकुलांची कामे करणाऱ्या ठेकेदाराकडून नेमण्यात आलेल्या एका अधिकाऱ्याने पहिल्या हप्त्याचा धनादेश प्राप्त करण्यासाठी तक्रारदाराकडे लाच मागितली होती याच परिसरातील एका तांदळा च्या दुकानामध्ये १७ हजार रुपयाची लाच स्वीकारताना सापळा लावून बसलेल्या नाशिकच्या लाचलुच प्रतिबंधक विभागा च्या पोलीस पथकाने रंगेहाथ पकडले.
केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेतर्गत शहरी आणि ग्रामीण भागातील गोरगरिबांना घरकुल देण्याची योजना सुरू आहे संगमनेर नगरपालिके अंतर्गत शहरात अनेक ठिकाणी घरकुल योजनेचे कामे सुरू आहे त्यासाठी शासनाच्या वतीने दिलेल्या एजन्सीच्या मार्फत ठेकेदाराची नेमणूक केली आहे अन त्या ठेकेदाराकडून विकास जोंधळे या योजने च्या कामकाजासाठी कोकणगाव येथील विकास जोंधळे या अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे.
संगमनेर शहरातील मोगलपूरा भागात एका लाभार्थ्याने घरकुलासाठी विकास जोंधळे या अधिकाऱ्याकडे अर्ज दिला होता तो मंजूर होवून आला आहे अनुदानाच्या पहिल्या हप्त्याचा धनादेश लाभार्थ्याला देण्यासाठी विकास जोंधळे याने तक्रारदाराकडे १७ हजार रुपयांच्यालाचेची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदाराने या अधिकाऱ्याच्या संदर्भात नाशिकलाच लोक प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यां कडे तक्रार दाखल केली होती त्यानुसार मंगळवारी सायंकाळी मोगलपूर्यतील एका तांदळाच्या दुकानात लाचेची रक्कम देण्याचे ठरले होते.
नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे यांनी आपल्या पथकासह संगमनेरात येवून मोगलपूऱ्यात सापळा रचला होता. ठरल्या प्रमाणे लाचखोर विकास सुरेश जोंधळे रा. कोकणगाव, ता. संगमनेर ) तेथे आला आणि त्याने तक्रारदाराकडून १७ हजार रुपयाची लाच स्वीकारली. त्याचवेळी आसपास दबा धरुन बसलेल्या एसीबी च्या पथकातील पो.नि. साळुंखे यांच्यासह हवालदार पंकज पळशीकर, पोलीस नाईक प्रकाश महाजन, चालक पोलीस नाईक परशुराम जाधव यांच्या पथकाने झडप घालीत त्याला रंगेहात पकडले याबाबत रात्री उशिरापर्यंत संगमनेर शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!