अल्पवयीन मुलीशी लग्न नडल ; नवरदेवासह त्याच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल
संगमनेर / लोकवेध live न्यूज 
एका अल्पवयीन मुलीशी विवाह लावून कनोली येथील नवरदेवास त्याच्या आई-वडिलांच्या विरोधात संगमनेर तालुका पोलीससात बालविवाह प्रतिबंध अधिनियमाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा विवाह मंगळवार ( 2 मे) रोजी तालुक्यातील कनोली येथे वराच्या घरासमोरच संगनमताने लावून देण्यात आला होता याबाबत माहिती समजल्यानंतर ग्रामसेवक रवींद्र केशव शिंदे, हनुमंत गाव तालुका राहाता यांनी अल्पवयीन मुलीचा जन्म दाखला आणि आधार कार्ड मागविले असता त्यात जन्मतारखेची खात्री व चौकशी केली असता मुलीचे वय कमी असल्याचे आढळून आले.
याबाबत कनोली गावचे ग्रामसेवक यांनी तालुका पोलीसांत दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी नवरदेव प्रवीण पोपट वर्पे (वय २९) त्याचे वडील पोपटएकनाथ वर्पे, आई रंजना पोपट वर्पे तिघे रा कनोली तालुका संगमनेर व पीडित मुलीची आई या चार जणांविरोधात अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देऊन बाल विवाह प्रतिबंध अधिनियमाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास डूमने यांच्या मार्गदर्शना खाली उपनिरीक्षक राजेंद्र सानप करत आहे.
12:22
=
® महाराष्ट्र संवाद क्यूज
৫Q
नवरीच्या जन्मतारखेचा दाखला वरील आणि आधार कार्ड वरील तारखेची तपासणी केली असता नवऱ्या मुलीचे वय 15 वर्षे 8 महिने 14 दिवस असे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मुलीचे वय कायद्याने लग्न होण्याइतपत पुरेसे झालेले नसल्याने ग्रामसेवक शिंदे यांनी या मुलीचा पती सासू-सासरे आणि तिच्या आई विरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
संगमनेर तालुका पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी या चारही आरोपींविरोधात बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2007 चे कलम 9, 10 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर. एस. सानप हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!