भारतीय जनता पक्षाच्या निमंत्रित सदस्य पदी मिनाक्षी ताई पाटील यांची नियुक्ती!
पिंपरणे / लोकवेध live न्यूज 

भारतीय जनता पक्षाच्या निमंत्रित सदस्य पदी उदगीर येथील भारतीय रेल्वे समितीच्या सल्लागार श्रीमती मिनाक्षी ताई पाटील यांची नियुक्ती होताच संगमनेर तालुक्याचे युवा नेते विक्रमसिंह खताळ पाटील दादा युवा मंच पिंपरण्याच्या वतीने पिंपरणे गावात फटाके फोडून जल्लोष साजरा केला! यावेळी शुभम देशमुख म्हणाले मिनाक्षी ताई पाटील गेल्या ३०वर्षांपासून भारतीय जनता पक्षात सक्रिय आहेत! त्यांनी पक्षाच्या विविध पदांवर काम केले पक्षाचे काम करताना पदाला न्याय देण्याचे काम ताईंनी केले! ताईंचे पक्ष वाढीसाठी मोलाचे योगदान आहे!

ताईंनी महाराष्ट्र भर बचत गट मोठ्या प्रमाणात स्थापन करून महिलांना रोजगार मिळवून दिला! ताईंना कामाची पावती मिळाली असे प्रतिपादन केले यावेळी विक्रमसिंह खताळ पाटील दादा युवा मंचचे शुभम देशमुख, ग्रामपंचायत सदस्य गोकुळ काळे, राहुल राहिंज, अमोल बागूल,अमोल ठोंबरे, दादाभाऊ गायकवाड,वसंत बागूल, सुशांत बागूल, लहानू ठोंबरे, रमेश खंडागळे, उन्मेश राहिंज देविदास बागूल उपस्थित होते!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!